YSR Congress News: खासदाराच्या पत्नी आणि मुलाचे अपहरण; पोलिसांनी अवघ्या काही तासांतच केली सुटका..

YSR Congress MP Wife and son Abducted: अपहरणाच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवली. मोबाईल लोकेशनच्या आधारे या अपहरणकर्त्यांचा शोध घेण्यात आला.
YSR Congress MP
YSR Congress MP Sarkarnama

YSR Congress MP's News : आंध प्रदेशमधील वायएसआर काँग्रेस पक्षाचे खासदार एमव्हीव्ही सत्यनारायण यांची पत्नी आणि मुलासह तिघांचे खंडणीसाठी अपहरण करण्यात आले. या घटनेमुळे आंध्र प्रदेशमध्ये (Andhra Pradesh) मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या माध्यमातून या तिघांची सुटका केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. (Wife and son of YSR Congress MP abducted)

वायएसआर काँग्रेस (YSRCongress) पक्षाचे खासदार (MP) एमव्हीव्ही सत्यनारायण यांची पत्नी ज्योती आणि मुलगा शरद यांचे अपहरण करून एक कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. ही घटना घडली, त्यावेळी खासदार सत्यनारायण हे विशाखापट्टणममध्ये नव्हते. मात्र, खासदाराचे जवळचे सहकारी आणि लेखा परीक्षक (CA) जी व्यंकटेश्वर राव त्यांना भेटण्यासाठी गेले, तेव्हा त्यांचेही त्या टोळीने अपहरण केले होते.

YSR Congress MP
NCP NEWS : राज्यातील सरकार शेतकरीविरोधी; अजित पवारांनी डागली तोफ

दरम्यान, विशाखापट्टणमचे पोलिस आयुक्त त्रिविक्रम वर्मा यांनी सांगितले की, अपहरणाच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवली. मोबाईल लोकेशनच्या आधारे या अपहरणकर्त्यांचा शोध घेण्यात आला. त्याआधारे काही तासांतच अपहरण झालेल्या खासदाराच्या पत्नीसह तिघांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

YSR Congress MP
Sahkar Shiromani Election : सहकार शिरोमणी काळेंकडेच राहणार की अभिजीत पाटील बाजी मारणार? सभासद उद्या करणार फैसला...

खंडणीखोरांच्या तावडीतून खासदार पत्नी, मुलाला आणि ऑडीटरला सोडविताना काही पोलिस अधिकारी किरकोळ जखमी झाले आहेत. यावेळी पोलिसांच्या वाहनाचेही नुकसान झाले आहे. खासदाराच्या पत्नी आणि मुलाचे अपहरण केव्हा झाले, हे मात्र कळलू शकलेले नाही. पण, ऑडिटरचे गुरुवारी अपहरण झाले होते, अशी माहिती आहे.

YSR Congress MP
Hitendra Thakur News : 'अप्पा, तुमच्या वसई-विरारमध्येही शासन आपल्या दारी येणार'; नव्या सरकारमधील हितेंद्र ठाकुरांचे महत्व मुख्यमंत्र्यांकडून अधोरेखित

या प्रकरणी पोलिसांनी हेमंत कुमारसह दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींच्या मोबाईल लोकेशनच्या आधारे ऑपरेशन सुरू केले आणि अपहरण केलेल्या तिघांना एलुरु-अमलापुरम महामार्गावर सुरक्षितपणे सोडण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com