Nawab Malik - Kranti Redkar  Sarkarnama
मुंबई

'आम्ही करोडपती नाही साधी माणसं': क्रांतीचा मलिकांवर पलटवार

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले आहेत. एनसीबी कार्यालयातील एका अधिकाऱ्याने त्यांना पत्र पाठवून एनसीबी कार्यालयातील चूकीच्या व्यवहारांबाबत माहिती दिली असल्याचे मलिकांनी सांगितले आहे. मात्र हे सर्व आरोप वानखेडे यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरने (Kranti Redkar) धूडकावून लावले आहेत.

'नवाब मलिकांनी ज्या बेनामी पत्राच्या आधारे आरोप केले आहेत, ते खोटे आहेत. असे पत्र कोणीही घरी बसूनही लिहू शकतो. आता ज्याने पत्र लिहीले आहे त्याने समोर यावे, बिनबुडाचे आरोप कोणीही करु शकतो. तुमच्याकडे पुरावे असतील तर कोर्टात जा, कोर्टात हे आरोप सिद्ध करा, आरोपांसोबत त्याचे पुरावेही द्या, आरोप सिद्ध झाले तर ते आरोपी ठरतील, असे म्हणत क्रांतीने सर्व आरोप धूडकावून लावल नवाब मलिकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.

यावर पत्रकरांनी त्यांना, तुम्ही का कोर्टात जात नाही, असे विचारले असता क्रांती म्हणाली की, ''आम्ही करोडपती नाही, आम्ही साधी माणसं आहोत. कोर्टात जायला आमच्याकडे इतके पैसे नाहीत, मलिकांकडे असतील तर त्यांनी कोर्टात जावे.''

याचबरोबर, क्रांतीने नवाब मलिकांनी ट्विटरवर केलेल्या आरोपांवरही भाष्य केले आहे. " मलिकांनी ट्विटरवर पोस्ट केलेले सर्व पुरावे खोटे आहेत. ट्विटरवर कोणीही काहीही लिहू शकतो. पण खोट्या जातप्रमाणपत्राच्या आधारावर वानखेडेंनी नोकरी मिळवली, हे आरोपही खोटे आहेत. आम्ही तुम्हाला वानखेडेंच्या सर्व कुटुंबियांचे प्रमाणपत्र दाखवू शकतो, संपुर्ण गावातील नातेवाईकांचेही प्रमाणपत्र दाखवू शकतो. पण जातीवरुन केलेले खोटे आरोप आम्ही सहन करणार नाही. असे म्हणत क्रांतीने मलिकांनी अजून योग्य पद्धतीने प्रमाणपत्राचा शोध घ्यायला हवा, असा टोलाही लगावला आहे.

''समीर वानखेडे गेल्या १५ वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. स्वच्छ प्रतिमेचे आणि प्रामाणिक अधिकारी त्यांची ओळख आहे. ते सत्याच्या मार्गाने काम करतात, पण ते पदावरुन दूर व्हावेत यासाठी काही लोक त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही यावेळी क्रांतीने केला. पण ते या संकटातून नक्कीच बाहेर पडतील. आरोप करणाऱ्यांना आरोप सिद्ध करता येणार नाही. वानखेडेंच्या विरोधात एक यंत्रणा काम करता आहे, आम्हाला धमकावले जात आहे, पण आम्ही या धमक्यांना घाबरणार नाही, असेही तिने म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT