Gautam Adani in  Baramati today, Rohit Pawar Latest News
Gautam Adani in Baramati today, Rohit Pawar Latest News Sarkarnama
मुंबई

लपवून छपवून बाकी करतात तसे आम्ही करत नाही

सरकारनामा ब्युरो

मुंबई - नवी मुंबईतील कार्यक्रमात कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर त्यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला. राज्याचे मंत्री अनिल देशमुख व नवाब मलिक यांना विधानपरिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली नाही. यावर भाजपने शुभशकून म्हंटले यावर रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ( We do not do as we are told )

अदानी व पवार यांच्या भेटीबाबत भाजपने केलेल्या टीकेला उत्तर देताना रोहित पवार म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवारांनी आपल्या पुस्तकात ही म्हंटल होतं की मी अदानींना खूप वर्षांपासून ओळखतोय. स्वच्छ मनाने मैत्री असेल तर आम्ही खुल्या पद्धतीने भेटत असतो. लपवून छपवून बाकी करतात तसे आम्ही करत नाही. जर एखादा व्यक्ती आपल्या कार्यक्रमाला येत असेल तर गाडी त्यांची आपण चालवली असेल तर त्यात गैर काय. या घटनेवरून भाजपचे लोकं जे पतंग उडवताहेत ते त्यांनी उडवू नये. त्यांना तेवढंच कळतं. गौतम अडचणींची गाडी चालवत असें आणि त्याची चर्चा होत असेल तर होऊ द्यात, असा टोलाही त्यांनी लागावला.

ते पुढे म्हणाले की, राष्ट्रवादीची दोन मते कमी झाली. हे भाजपला शुभशकुन वाटत असेल तर जी दोन मत कमी झाली. त्याचा आरोप सिद्ध न होता. त्या दोन लोकांना जेल मध्ये ठेवले जात आहे. सीबीआय आणि ईडीचा वापर करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. याला भाजप शुभशकुन म्हणत असले तरी ते संविधांनाच्या विरोधात आहेत त्या भाजपला शुभच असतील त्या शिवाय ते निवडून येऊ शकत नाहीत. भाजप लोकशाहीला सतत फाटा देतात. त्यांनी काही बोलल तरी महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि पक्ष काळजी घेऊन येणारी निवडणूक लढतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

निवडणुका आल्या की चर्चा या होणारच. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या लोकांनी शिवसेनेच्या आमदारांना फोन केला, असे ते म्हणत असतील तर ती फक्त चर्चाच आहे. याबाबत कोणीही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. निवडणुका पूर्वी 3 दिवस भाजप अश्याच काही पुड्या सोडतात. ही तर भाजपची रणनीती आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT