Shrikant Bhartiy 
मुंबई

आमदारांच्या मनात काय आहे ते लवकरच दिसेल : श्रीकांत भारतीय यांचे सूचक विधान

Vidhan Parishad Election 2022| BJP | Shrikant Bhartiy| देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहणारे भारतीय भाजपमध्ये लोकप्रिय आहेत.

सरकारनामा ब्युरो

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : जनतेच्याच नव्हे तर सत्ताधारी आमदारांच्याही मनात मविआबद्दल रोष आहे, तो आजच्या मतदानातून व्यक्त होईल असा विश्वास भाजपचे (BJP) उमेदवार श्रीकांत भारतीय यांनी व्यक्त केला आहे. भाजप सातत्याने संपर्क ठेवते, संबंध वाढवते.त्याच जोरावर पाचही उमेदवार निवडून येतील, असंही त्यांनी म्हटलं आहे. (BJP Candidate Shrikant Bhartiy news)

विधान परिषदेच्या दहाव्या जागेसाठी काँग्रेसचे भाई जगताप आणि भाजपचे प्रसाद लाड यांच्यात लढत होत आहे. त्यामुळे विधानपरिषदेची खरी लढत ही काँग्रेस आणि भाजपमध्येच असल्याचं चित्र दिसत आहे.काँग्रेसचे भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे विधानपरिषद निवडणूकीच्या रिंगणात आहेत. विधानपरिषद निवडणुकीत मुख्य लढत ही कॉंग्रेसचे भाई जगताप विरूद्ध भाजपचे प्रसाद लाड अशी होणार आहे. भाई जगताप हे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असल्याने महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. भाई जगताप दूसऱ्या क्रमांकाचे उमेदवार असल्यानं त्यांची पहिल्या पसंतीची मते आणि अपक्षांवर त्यांच पूढचं भविष्य ठरणार आहे.

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान सुरु झाले आहे. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेतही धक्कादायक निकाल लागणार का, याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विधान परिषदेच्या एकूण 10 जागांसाठी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. संध्याकाळी 5 वाजता मतमोजणी सुरू होईल. तर राज्यसभेच्या निवडणुकीत झालेल्या दगाफटक्यानंतर महाविकास आघाडीही चांगलीच सावध झाली आहे. भाजपनेही या निवडणुकीत चमत्कार दाखवण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

श्रीकांत भारतीय संघटनमंत्री म्हणून भाजपचे काम बघत.संघ परिवारात सक्रीय असलेले कुशल कार्यकर्ते अशी त्यांची ओळख आहे.अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ कार्यकर्ते, त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहणारे भारतीय भाजपमध्ये लोकप्रिय आहेत.अनाथांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी तर्पण नावाची संस्था उभारली आहे. या संस्थेच्या माध्यमातून ते शिष्यवृत्ती, शिक्षणखर्च, लग्न जमवणे अशी अनाथांची वडिल म्हणून काळजी घेणारी कामे करत असतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT