Weekly sarkarnama Released by CM Eknatha Shinde  sarkarnama
मुंबई

Weekly Sarkarnama Released : डिजिटलचे व्यासपीठ गाजवलेला 'सरकारनामा' आता 'साप्ताहिक' स्वरुपातही; मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते दिमाखात प्रकाशन

Video Weekly sarkarnama Released Eknatha Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 'सकाळ' माध्यम समुहाच्या 'साप्ताहिक सरकारनामा'चे प्रकाशन करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी 'सरकारनामा'ला शुभेच्छा दिल्या.

Roshan More

Weekly sarkarnama Released : डिजिटलचे व्यासपीठ गाजवत असलेला 'सरकारनामा' आता 'साप्ताहिक' स्वरुपातही वाचकांच्या भेटीला शनिवारपासून (ता.7) येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईमध्ये आज (शुक्रवारी) 'साप्ताहिक सरकारनामा'चे प्रकाशन मोठ्या दिमाखात पार पडले.

यावेळी 'सकाळ' माध्यम समूहाचे संपादक सम्राट फडणीस, कार्यकारी संपादक शीतल पवार, मुंबई 'सकाळ'चे संपादक राहुल गडपाले, सकाळ समूहाचे मुख्य संपादक निलेश खरे यावेळी उपस्थित होते.

साप्ताहिक'सरकारनामा'ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिला. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, माध्यमांची भूमिका महत्त्वाची असते. डिजिटल असले तरी वाचल्याशिवाय समाधान होत नाही. म्हणून शेतकरी सात-बारा काढतो. विश्वास महत्त्वाचा असतो. तो 'सरकारनामा'च्या माध्यमातून पूर्ण होईल. यात खूप चांगली मांडणी आहे.

'माध्यमांनी केवळ आरोप प्रत्यारोप न दाखवता. विकास प्रकल्पांची देखील माहिती दिली पाहिजे. आम्ही शासन म्हणून काम करतो. एकीकडे विकास सुरू आहे. जुन्या प्रकल्पांना आम्ही चालना दिली आहे. नवीन प्रकल्प हाती घेतले आहेत. अटल सेतू, समृद्धी हायवे अर्थव्यवस्थेला चालना देणारे प्रकल्प आहेत. राज्याच्या हिताचे जे प्रकल्प आहेत. त्याची आपण माहिती दिली पाहिजे.', अशी अपेक्षा मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांकडे व्यक्त केली.

लोकहिताचे दाखवले पाहिजे...

लोकहिताच्या प्रकल्पाची माहिती माध्यमांनी दिली पाहिजे. लोकहिताचे काय आहे, हे दाखवले पाहिजे. आरोप प्रत्यारोप होत असतात. मात्र लोकहिताचे प्रकल्प, योजना यासाठी तुम्ही माध्यम बनू शकता. सरकार जेव्हा निर्णय घेते. प्रशासकाचे ते काम आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, या योजनेसोबत आम्ही इतर चांगल्या योजना देखील सुरू केल्या आहेत. मात्र, लाडकी बहीण योजना खूपच प्रसिद्ध आहे. या योजनेच्या खाली इतर योजना दबल्या आहेत. त्या योजना तु्म्ही दाखवल्या तर त्याचा फायदा लोकांना होईल, असे आवाहनही मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

साप्ताहिक 'सरकारनामा'च्या मागील भूमिका स्पष्ट करताना शीतल पवार यांनी 'सकाळ' माध्यम समुह सर्वसमावेशक असल्यासोबत सर्वव्यापी आहे. या माध्यमातून जे वास्तव आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे सांगत कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT