Priyanka Chaturvedi : Sanjay Shirsat Sarkarnama
मुंबई

Priyanka Chaturvedi Tweet : 'मी कशी दिसते, खासदार का आहे?' ; चतुर्वेदींनी घेतला शिरसाटांचा खरपूस समाचार..

Priyanka Chaturvedi Tweet On Sanjay Shirsat : "50 खोक्यांसाठी आपला आत्मा आणि प्रामाणिकपणा विकला.."

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उत्तर भारतीयांचा मेळाव्यात काल शनिवारी ( दि. २९ ऑगस्ट) खासदार प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटावर जोरदार हल्लाबोल केला होता. यानंतर शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी प्रियांका चतुर्वेदींवर टीका करताना वादग्रस्त असे विधान केले होते.

'शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले होते की, आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी प्रियंका चतुर्वेदींना त्यांचे सौंदर्य पाहून राज्यसभा सदस्य केले होते, असे शिरसाट म्हणाले होते. आता यावर स्वत: चतुर्वेदी यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

प्रियांका चतुर्वेदी यावर ट्वीट करत म्हणाल्या, "मी कशी दिसते आणि मी जिथे आहे तिथे का आहे, हे मला एका गद्दार व्यक्तीने सांगायची गरज नाही, ज्याने 50 खोक्यांसाठी आपला आत्मा आणि प्रामाणिकपणा विकला, अशा शब्दात चतुर्वेदींनी शिरसाटांचा समाचार घेतला.

"संजय शिरसाट हे राजकारण आणि महिलांबद्दलच्या त्यांच्या विचारांमधील व्यापक आजाराचे एक उत्तम उदाहरण आहे, ते त्यांच्या टिप्पण्यांमधून स्वतःचे असभ्य चारित्र्य निश्चितपणे प्रदर्शित करतात, यात आश्चर्य नाही की भाजपने त्यांना त्यांच्यासोबत ठेवले आहे, असे भाष्य करत त्यांनी भाजपवरही टीका केली.

काय म्हणाले होते संजय शिरसाट ?

"प्रियांका चतुर्वेदी आपल्या भाषणात म्हणतात की गद्दारांना माफी नाही. पण त्या स्वतः काँग्रेसशी गद्दारी करून शिवसेनेत आल्या आहेत आणि आम्हाला देशद्रोही म्हणत आहेत. एकदा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे मला म्हणाले होते की, 'आदित्य ठाकरे यांनी प्रियंका चतुर्वेदीला त्यांचे सौंदर्य पाहून राज्यसभा सदस्य केले होते. प्रियांका चतुर्वेदींनी आम्हाला गद्दार म्हणणे हा मोठा विनोद असल्याचे," संजय शिरसाट म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT