Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एकाच मंचावर येणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. एक ऑगस्ट रोजी प्रदान करण्यात येणाऱ्या 'लोकमान्य पुरस्कार' सोहळानिमित्त मोदी-पवार तब्बल साडेआठ वर्षांनंतर एकाच मंचावर येत आहेत. याआधी हे दोन्ही नेते १४ फेब्रुवारी २०१५ रोजी बारामती येथे झालेल्या कार्यक्रमात एकत्र आले होते. यानंतर तब्बल साडेआठ वर्षांनी असा योग जुळून आला आहे. (Latest Marathi News)
यात आणखी एक विशेष भाग म्हणजे, राष्ट्रवादीत बंड केलेले आणि शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार हे सुद्धा पहिल्यांदाच एका जाहीर कार्यक्रमात एकाच मंचावर येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित असतील, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार आहेत.
यंदाचा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. मंगळवारी १ ऑगस्ट रोजी हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडणार आहे. यासाठी नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.