Aditya Thackeray  Sarkarnama
मुंबई

MU Senate Election : एका रात्रीत काय घडलं ? सिनेट निवडणुकांच्या स्थगितीवर आदित्य ठाकरेंचा सवाल !

Aditya Thackeray Mumbai University Senate Election News : साधारण सव्वा लाख मतदारांनी या निवडणुकीसाठी नोंदणी केली होती..

सरकारनांमा ब्यूरो

Mumbai News : मुंबई विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आलेल्या सिनेट निवडणुका अचानकपणे स्थगित केल्या आहेत. त्यावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. विद्यार्थी संघटना आक्रमक होत आहेत. या निवडणुकांसाठी युवा सेनेची (ठाकरे गट) जोरदार तयारी सुरू होती. मात्र आता निवडणुका स्थगित केल्याने यावर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विद्यापीठ व्यवस्थापन आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. (Latest Marathi News)

आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक 2010 मध्ये लढवली तेव्हा दहापैकी आठ जागा जिंकल्या. २०१७ मध्ये १० पैकी १० जागा जिंकल्या होत्या. आमच्यासमोर सगळेच पक्ष होते. तरी देखील आमचा मोठा विजय झाला होता. मात्र मागील अनेक दिवसांपासून निवडणुका रखडल्या आहेत. विद्यापीठीचा निवडणूक कार्यक्रम मोठ्या कालावधीनंतर जाहीर करण्यात आला होता. पण एकदा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर ती रद्द होण्याची ही पहिलीच वेळ होती.

एका रात्रीत असं काय घडलं की निवडणूक स्थगित झाली? याच्यात काही गडबड गोंधळ झालाय का? साधरण सव्वा लाख मतदारांनी या निवडणुकीसाठी नोंदणी केली होती. सर्व कार्यक्रम ठरला होता. मग असं काय झालं की, रात्री एक बैठक घेतली आणि निवडणूक स्थगित केली गेली, असाही सवाल ठाकरेंनी विचारला.

"परिपत्रकात म्हंटले आहे की, बैठकीनुसार निवडणूक रद्द झाली, ही बैठक कुठे झाली? किती वाजता झाली? कुणाच्या घरी झाली? बैठकीत कोण कोण होतं? याची माहिती कुणालाच नाही. परिपत्रकात शासन आदेश असा उल्लेख आहे. मात्र विद्यापीठाचे कुलगुरू, उपकुलगुरू यांचे फोन बंद येत आहेत," असे आदित्य ठाकरे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT