Maharashtra Politics: अजित पवार यांच्यासह त्यांचे काही समर्थक आमदारांनी भाजपशी हातमिळवणी करत सत्तेत सामील झाले. राज्यात शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीतही मोठी फूट पडली. या राजकीय भूंकपानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मातोश्रीवर बैठक पार पडली.या बैठकीनंर राज्यातील संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण राज्याचा दौरा करण्याचे जाहीर केलं आहे. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत समान नागरी कायदा आणि सध्याच्या बदललेल्या राजकीय स्थितीला कशा प्रकारे सामोरे जायचं, यावर चर्चा झाली. तसेच. बाळासाहेबांची समर्थनार्थ भूमिका होती, यामुळे, ठाकरे गट कायद्याचा मसुद्यानुसार भूमिका जाहीर करणार असल्याचही सांगण्यात येत आहे. (Uddhav Thackeray)
मातोश्रीत झालेल्या बैठकीवर भाष्य करताना आमदार भास्कर जाधव म्हणाले, 'गेल्या काही महिन्यांपासून मला महाराष्ट्रामध्ये फिरायचं आहे असं उद्धव ठाकरे सातत्याने सांगत आहेत. उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या दौरा करणार आहेत. तसेच राष्ट्रवादीतील फुटीनंतर उद्धव ठाकरे 'एकला चलो रे'ची भूमिका घेणार का, यावर बोलताना भास्कर जाधव म्हणाले, 'या प्रकारची कोणतीही चर्चा बैठकीत या बैठकीत झाली नाही. पण महाविकास आघाडीत फूट पाडण्यासाठी भाजपकडून अफवा पसरवल्या जात असल्याचा आरोपही भास्कर जाधव यांनी यावेळी केला.
दरम्यान, राष्ट्रवादीतील फूटीनंतर राज्यात जी परिस्थिती उद्भवली आहे. या परिस्थितीचा सामना करणासाठी महाविकास आघाडी सज्ज झाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते सर्वजण मिळून महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. महाविकास आघाडीच लवकरच लोकशाही विरोधी भाजपला राज्यातून उखडून टाकेल. यासाठी उत्तर महाराष्ट्रातून महाविकास आघाडीचे नेते दौऱ्याला लवकरच सुरूवात करतील,अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.