Jitendra Awhad News: राष्ट्रवादीत घडणाऱ्या घडामोडींवर बोलताना जितेंद्र आव्हाडांच्या डोळ्यात पाणी...

Maharashtra Politics: राष्ट्रवादी पक्षात आता दोन गट पडले आहेत.
Jitendra Awhad News
Jitendra Awhad NewsSarkarnama
Published on
Updated on

NCP News: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांसह एकूण नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी पक्षावरही अजित पवारांनी दावा केल्यामुळे राष्ट्रवादीत आता दोन गट पडले आहेत.

राष्ट्रवादी पक्षात घडणाऱ्या घडामोडींवर जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी या सर्व घडामोडींबाबत भाष्य करताना जितेंद्र आव्हाडांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.

राष्ट्रवादी पक्षातील फुटीबाबत प्रतिक्रिया घेताना जितेंद्र आव्हाड यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला का? असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना जितेंद्र आव्हाड भावूक झाले. तसेच आव्हाडांच्या डोळ्यात यावेळी पाणी आल्याचेही पाहायला मिळाले.

Jitendra Awhad News
Cabinet Expansion : 'राष्ट्रवादीचे सर्व मंत्री सीनिअर, म्हणून...'; मंत्रिपदावरुन युती सरकारमध्ये 'नाराजी'नाट्य..?

जितेंद्र आव्हाड म्हणाले, "हमको कुछ नहीं मिला 35 साल मे, पर मै मेरे बाप के साथ हू..!, शरद पवार अशा अनेक लढाया लढलेले आहेत. शरद पवार यांच्यावर जेव्हा-जेव्हा असे संकट आले, तेव्हा-तेव्हा ते मजबुतीने उभे राहिले आहेत आणि आताही राहतील. शरद पवारांनी ज्यांना उभ केलं त्यांनीच ही वेळ आणल्यामुळे दु:ख होतं", असं जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.

Jitendra Awhad News
Ajit Pawar Group News : अजित पवारांना अर्थ, तर वळसे पाटलांना कृषी मंत्रालय?; इतर सात जणांना मिळणार ‘ही’ खाती...?

ते पुढे म्हणाले, "जे आज तिकडे जावून बसले आहेत ना? त्यांना सोन्याचे दिवस फक्त शरद पवार यांच्यामुळे आलेले आहेत. शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला का नाही? हे महाराष्ट्राला माहिती आहे. जनता याचा जबाब देईल. शरद पवार हे कुणाला बरोबर घेतील त्याच्याशी माझं काही म्हणण नाही. मात्र, ज्यांनी पक्ष स्थापन केला, उभा केला, त्यांनाच म्हणतात पक्ष आमचा आहे?", असं म्हणत जितेंद्र आव्हाड भावूक झाले.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com