Vaibhav Thorat Joins Shinde Group
Vaibhav Thorat Joins Shinde Group Sarkarnama
मुंबई

Vaibhav Thorat Joins Shinde Group: भ्रष्टाचाराचा आरोप असलेले वैभव थोरात शिंदे गटात; आता मनसेची भूमिका काय?

सरकारनामा ब्युरो

Vaibhav Thorat Joins Shinde Group : ठाकरे गटाच्या युवासेनेचे माजी सिनेट सदस्य ऍड. वैभव थोरात यांनी 5 मे ला शिंदे गटात पक्ष प्रवेश केला. युवा सेनेच्या अंतर्गत राजकारणाला कंटाळून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्याचं त्यांनी सांगितलं. पण दोन महिन्यांपुर्वी मनसेने थोरात यांच्यावर कोव्हिड घोटाळ्याचे आरोप केले होते. पण थोरातांनी आता शिंदे गटात प्रवेश केल्यावर आता मनसे यावर काय भूमिका घेणार, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान, वैभव थोरात यांच्यावर काही दिवसांपुर्वी मनसेकडून (MNS) कोव्हिड काळात घोटाळा केला असल्याचा आरोप केला होता. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी वारंवार यासंदर्भात पत्रकार परिषदा घेऊन थोरांतांनी कोव्हीड काळात घोटाळा कसा केला, याचे दाखले देत त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

थोरातांनी केलेल्या या घोटाळ्याची ACB मार्फत चौकशीसाठी देशपांडे यांनी तक्रार देखील दाखल केली होती. इतकेच नव्हे तर महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांना भेटून कारवाई करण्याची मागणी केली होती. पण आता वैभव थोरात यांनी शिंदे गटात (Eknath Shinde) प्रवेश केल्याने आता मनसेची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वैभव थोरात हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (UddhavThackeray) गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू होते. ते पिंपरी-चिंचवडचे शिवसेना संपर्कप्रमुखही होते. गेल्या पाच वर्षांत सिनेट सदस्य म्हणून मुंबई विद्यापीठ प्रशासनालाही विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर धारेवर धरले होते.

दोन महिन्यांपुर्वी संदीप देशपांडे यांनी वीरप्पन गँगचा घोटाळा मी उघड करणार असे ट्विट केले होते. त्यावेळी त्यांनी वैभव थोरात यांच्यावर गंभीर आरोप केले होते. कोरोना काळात कोरोना सेंटरमध्ये जेवण पुरविणे, लाँड्री, सॅनिटायझर पुरविणे यासारखी कंत्राटे थोरात यांच्या कंपनीला देण्यात आली होती. पण या कामाचा कोणताही अनुभव नसताना त्यांच्या कंपनीला ही कंत्राटे कशी देण्यात आली, ही कंत्राटे देण्यासाठी कोणती शक्ती काम करत होती? याचा तपास केला जावा, अशी मागणी देशपांडे यांनी केली होती.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT