Karnataka Assembly Elections 2023 : लग्नाच्या मंडपात पोहचण्याआधी ती गेली थेट मतदान केंद्रात.. ; नारायण मूर्ती, प्रकाश राज यांनी..

Karnataka Poll LIVE Updates : 2,615 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत.
Karnataka Poll LIVE Updates
Karnataka Poll LIVE Updates Sarkarnama

Karnataka Assembly Elections 2023 : कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी मतदानास सुरवात झाली आहे. मतदानासाठी सकाळपासून मतदान केंद्राबाहेर मतदारांना रांगा लावल्या आहेत.

अभिनेता प्रकाश राज, रमेश अरविंद , इन्फोसिसचे अध्यक्ष नारायण मूर्ती, सुधा मूर्ती आदींनी मतदानाचा हक्क बजावला. मुदिगेरे चिक्कमगलुरु येथे लग्नापूर्वी एका तरुणीने मतदान केले. त्यानंतर ती मंडपाकडे रवाना झाली. राजकीय पक्षाच्या नेतेही मतदान करण्यासाठी मतदान करण्यासाठी येत आहेत.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसोबत आज पंजाबच्या जालंधर लोकसभा मतदार संघ, उत्तर प्रदेशातील स्वार टांडा विधानसभा, छानबे विधानसभा , आणि ओडिशा येथील झारसुगुड़ा आणि मेघालय येथी सोहियोंग विधानसभा मतदार संघात आज मतदान होत आहे.

Karnataka Poll LIVE Updates
Karnataka election : निवडणूक आयोगाने तोडले रेकॉर्ड ; कोट्यवधी रुपयांच्या वस्तू जप्त, कर्नाटकात आज मतदान

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी (Karnataka Election 2023) मतदानाला सुरवात झाली आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी कर्नाटकातील 5 कोटी 31 लाख मतदार मतदान करणार असून हे मतदान राज्यातील 2,615 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत.

Karnataka Poll LIVE Updates
Karnataka Polls 2023 LIVE : पीएम मोदींच्या video वर काँग्रेसचा आक्षेप ; निवडणूक आयोगाकडे तक्रार ; आज मतदान

प्रचाराच्या काळात भाजपा, काँग्रेस, धर्मनिरपेक्ष जनता दल या तिन्ही पक्षांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत. याच कारणामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. गेल्या पाच वर्षांत कर्नाटकात तीन मुख्यमंत्री झाले. सध्या भाजपचे १२१ आमदार आहे, काँग्रेसकडे ७० तर जेडीएसकडे ३० आमदार आहेत.

या विधानसभेसाठी काँग्रेसचे २२१, भाजप सर्व २२४, जेडीएस २०८, आम आदमी पार्टी ने २०८, बसपा १२७, समाजवादी पार्टी १४,राष्ट्रवादीचे ९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.या निवडणुकीत भाजपचे ३८, काँग्रेस ३६, जेडीएसचे ३१ उमेदवार एससी आहेत. काँग्रेसचे १५, जेडीएसचे २० उमेदवार मुस्लिम आहेत. भाजपचा एकही उमेदवार या वर्गांतील नाही.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com