Fadnavis-Thackeray Meet:
Fadnavis-Thackeray Meet: Sarkarnama
मुंबई

Fadnavis - Raj Thackeray Meet: राज ठाकरे यांच्यासोबतच्या भेटीत कोणती चर्चा झाली; फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (ता.२९) रात्री उशिरा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. सोमवारी रात्री उशिरा अचानक ही भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. फडणवीसांनी ठाकेरंची भेट का घेतली? आगामी निवडणुकांबाबत काही त्यांच्यात काही चर्चा झाली का? असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळातून उपस्थित करण्यात येत आहेत.

या चर्चा सुरू असतानाच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या भेटीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. "अराजकीय गप्पा मारण्यासाठी मी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेलो होतो", असं फडणवीस यांनी सांगितलं आहे.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले,"बऱ्याच दिवसांपासून आमचं ठरलं होतं की एक दिवस गप्पा मारायला बसू. त्यासाठी मुहूर्त काल लागला. आम्ही गप्पा मारल्या मात्र, या भेटीत अराजकीय गप्पा झाल्या. असं ठरलं होतं की, राजकीय सोडून गप्पा करायच्या. गप्पा या अराजकीय असतात", असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिकांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आतापासूनच तयारीला लागले आहेत. यासाठी अनेक नेत्यांच्या भेटीगाठी देखील वाढल्या आहेत. यातच भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

(Edited By- Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT