Trinesh Devlekar Latest News Sarkarnama
मुंबई

झारखंड मुक्ती मोर्चाने धनुष्यबाण चिन्हावर महाराष्ट्रात निवडणूक लढवली तर चालेल का?

Shivsena : मग 2021 मध्ये आम्ही बिहार ग्रामपंचायतीमध्ये कोणत्या चिन्हावर निवडणूक लढविली?

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : निवडणूक आयोगाने मशाल हे चिन्ह शिवसेनेच्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला दिल्यानंतर समता पार्टीने या चिन्हावर दावा ठोकत ठाकरे गटाला कोंडीत पकडले आहे.

धनुष्यबाण गेल्याचं दुःख जसं तुम्हाला तसे आम्हाला देखील मशाल गेल्याचे दुःख आहे,असे म्हणत समता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष तृणेश देवळेकर यांनी म्हटलं आहे. झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाला देखील धनुष्यबाण चिन्ह मिळाल आहे. उद्या जर झारखंड मुक्ती मोर्चा पक्ष महाराष्ट्रात निवडणूक लढावायला आला, तर शिवसेना काय करेल, असा टोला देखील त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

समता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवळेकर यांनी गुरुवारी कल्याण पोलीस आयुक्तांची भेट घेत सुरक्षेची मागणी केली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. (Trinesh Devlekar Latest News)

देवळेकर म्हणाले, समता पार्टीने निवडणूक न लढविल्याने चिन्ह गोठविण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. झारखंड मुक्ती मोर्चा ने महाराष्ट्रात येऊन निवडणुका लढविल्या तर शिवसेनेला हे चालणार आहे का? त्यांनी हे जाहीर करावे. कारण शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह झारखंड मुक्ती मोर्चाला दिलेले आहे. उद्या जर का झारखंड मुक्ती मोर्चा महाराष्ट्रात येऊन निवडणूक लढविल्या तर मग शिवसैनिक काय करतील, असा सवाल देवळेकर यांनी केला.

निवडणूक आयोगाला आम्ही पत्र दिले आहे. त्याच्यामध्ये आम्ही हे नमूद केले की, समता पार्टीने 2014 मध्ये देशभरात निवडणूक लढवली होती. निवडणूक आयोगाने असे दाखविले की 2004 मध्ये आमच्या पक्षाचे चिन्ह गोठविले गेले. मग त्यांनी हे जाहीर करावे की, 2014 आणि 2021 मध्ये बिहार ग्रामपंचायतीमध्ये आम्ही कोणत्या चिन्हावर निवडणूक लढविली होती, असा सवालही त्यांनी व्यक्त केले.

दरम्यान, निवडणूक आयोगाने जाहीर करायला पाहिजे. कारण ही त्यांची चूक आहे. कोणत्याही पक्षाचे चिन्ह हे त्या पक्षाची ओळख असते. आज शिवसेनेचे धनुष्यबाण गेले आहे. तर त्यांना जसे दुःख होते. तसे आम्हालाही आमचे चिन्ह मशाल गेल्याने दु:ख होत आहे.

निवडणूक आयोगाने याबाबत जातीने दखल घेऊन लवकरात यावर निर्णय द्यावा आणि पक्षातील अंतर्गत वाद कमी करावा. यासाठी निवडणूक आयोगाने प्रयत्न करावे. भारतीय निवडणूक आयोगाला काल मी पुन्हा एकदा पत्र दिले आहे त्यावर निकाल लागण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT