Cabinet Expansion News Sarkarnama
मुंबई

Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? सुनील तटकरेंनी थेट तारीखच केली जाहीर

Cabinet Expansion News: मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर जोरदार हालचाली

सरकारनामा ब्यूरो

Political News: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल होत मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर या नव्या मंत्र्यांना बंगले आणि दालनाचे वाटपही करण्यात आले. मात्र, अजित पवारांसह नऊ मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेऊन १० दिवस उलटून गेले तरी अद्याप खाते वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही.

खाते वाटपाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महत्वाची बैठकही पार पडली. पण या बैठकीत देखील खाते वाटपासंदर्भात कोणताच तोडगा निघाला नाही.

आता यावर तोडगा काढण्यासाठी राज्यातील काही दिग्गज नेते दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. तसेच हे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे. आता असे असतानाच राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना मंत्रिमंडळाच्या विस्ताराची थेट नवी तारीखच सांगितली आहे.

सुनिल तटकरे नेमकं काय म्हणाले?

"मंत्रिमंडळ विस्तराबाबत माध्यमांमध्ये वेगवेगळ्या चर्चा होत असतात. मात्र, आम्ही सर्वांनी सामुदायिक तत्वावर काम करण्याचा निर्णय घेतला आहे. वेळेमध्ये थोडाफार उशीर होऊ शकतो. पण कुठल्याही प्रकारचा गैरसमज मनामध्ये न ठेवता सर्वांनी मिळून पुढे जाण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार आणि पालकमंत्री या संदर्भातील निर्णय उद्या संध्याकाळपर्यंत (दि.12 जुलै) झालेला आपल्याला पाहायला मिळेल", असं सुनिल तटकरे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये बैठकांचं सत्र सुरु असूनही मंत्रिमंडळाच्या खाते वाटपाचा तिढा सुटताना दिसत नाही. त्यामुळे आता यावर दिल्लीतील भाजपचे वरिष्ठ नेते काय मार्ग काढतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT