Cabinet Expansion 2023 : खातेवाटपाचा तिढा कायम; अजितदादा आता गाठणार दिल्ली

Maharashtra Government Cabinet Distribution: अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन १० दिवस उलटून गेले आहेत.
Maharashtra Cabinet Expansion News
Maharashtra Cabinet Expansion NewsSarkarnama
Published on
Updated on

Mantrimandal Vistar News: अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन १० दिवस उलटून गेले आहेत. तरीही अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खाते मिळालेले नाही. मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक झाली. मात्र, या बैठकीमध्ये खाते वाटपासंदर्भात कुठलाही तोडगा निघालेला नाही.

अनेक दिवसांपासून खाते वाटप रखडलेले आहे. त्यावर बैठकांमध्ये मुंबईत तोडगा निघत नसल्यामुळे अजित पवार आणि राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल दिल्लीला जाणार आहेत. दिल्लीमध्ये हे दोन्ही नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. मंगळवारी रात्री चर्चा झाल्यावर ही खाते वाटपाचा तिढा कायम आहे.

Maharashtra Cabinet Expansion News
Maharashtra Cabinet Expansion: खातेबदलावरुन शिंदे गट बसला अडून; देवेंद्र फडणवीस अन् अजित पवारांकडून मनधरणीचे प्रयत्न

आधी मंत्रिमंडळ विस्तार मगच खातेवाटप ही शिंदे गटाची भूमिका कायम आहे. त्यातच अजित पवार गटाला अपेक्षित खाती मिळत नसल्याने तिढा कायम आहे. त्यामुळे अजित पवार आज दिल्लीला जाणार आहेत. मंत्रीमंडळविस्तारात होणाऱ्या खाते वाटपावरून चालू आसलेल्या चर्चेत शिंदे अडून बसल्याची व फडणवीस, पवार यांच्याकडून मनधरणीचे प्रयत्न सुरु असल्याची महिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. या सगळ्या गोष्टीवर आता दिल्लीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.

शिंदे गटातील काही मंत्र्यांची महत्वाची खाती अजित पवार (Ajit Pawar) गटाला देण्यात येणार आहेत. काही मंत्र्यांना मंत्रिपदाचा करावा लागणारा त्याग व खातेबदलामुळे काही मंत्र्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्याचबरोबर अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते देण्यात येत असल्याने शिंदे गटाच्या पोटात गोळा आला आहे. त्यामुळे पवार यांना अर्थ खाते देण्यास शिंदे गटातील मंत्र्यांचा आणि आमदारांचा विरोध आहे, यावर तोडगा निघालेला नाही.

Maharashtra Cabinet Expansion News
Ajit Pawar News : बच्चू कडूंसह आमदारांची चिंता व्यर्थ तर नाही, कदाचित यावेळी...

आपला नंबर लागेल या आशेने शिंदे गटासोबत भाजपाचे (BJP) नेतेही देव पाण्यात घालून बसले होते. मात्र, गेल्या आठवड्यात झालेल्या राजकीय उलथापालथीत आपला नंबर लागेल की नाही, याची आता कोणालाही खात्री वाटत नाही. त्यामुळे आता किती कॅबिनेट आणि किती राज्यमंत्री करायचे हे कठीण गणित शिंदे, फडणवीस, पवार यांच्या बैठकीमध्ये सुटलेले नाही. त्यामुळे आता दिल्लीच्या बैठकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com