Ujjwal Nikam
Ujjwal Nikam Sarkarnama
मुंबई

Andheri By-Election ...तर अंधेरी पोटनिवडणुकीत धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेला मिळेल : उज्ज्वल निकम

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने आपला उमेदवार उभा केला नाही, तर धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेला (Shivsena) मिळू शकते, असे महत्वपूर्ण विधान ज्येष्ठ विधिज्ञ ॲड उज्ज्वल निकम यांनी केले आहे. (...while Shiv Sena will get the symbol of bow and arrow in Andheri by-election: Ujjwal Nikam)

शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकीसाठी येत्या ३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून ६ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. अर्ज भरण्याची मुदत १४ ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर ही पहिलीच निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीशी बोलताना निकम यांनी हे महत्वपूर्ण विधान केले आहे.

ॲड निकम म्हणाले की, शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट या दोघांकडूनही धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर दावा ठोकला जात आहे. दोघेही निवडणूक चिन्हाबाबत दावा करत असतील तर निवडणूक आयोगाला निर्णय करावा लागेल. निवडणूक चिन्हाबाबत कोणीही दावाच केला नाही, तर धनुष्यबाणाबाबत वाद येणारच नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच हे धनुष्यबाण चिन्ह मिळणार. शिंदे गटाने भाजपपुरस्कृत उमेदवार उभा केला आणि ठाकरे यांनीही उमेदवार उभा केला तर निवडणूक चिन्ह कोणाला मिळेल. निवडणूक चिन्हाचा वाद या पोटनिवडणुकीच्या अगोदर संपला नाही, तर दोन्ही बाजूंकडून पुरावा द्यायला वेळ लावला जात असेल तर निवडणूक आयोगापुढे एकच पर्याय उरतो, तो म्हणजे निवडणूक चिन्ह गोठवणे. दोन्ही बाजू दावा करत असतील आयोगाला ते चिन्ह गोठवावे लागेल.

दरम्यान, अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. दसरा मेळाव्याबाबत शरद पवार म्हणाले की, शिवसेनेचा मेळावा आहे. तो वेगळा पक्ष आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस त्यात काही करणार नाही. राज्यात दसरा मेळाव्याहून जे सुरू आहे, ते दुर्दैवी आहे. एका पक्षाचे दोन भाग झाले आहेत, पण त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण बिघडणार नाही, याची खबरदारी प्रमुख नेत्यांनी घ्यायला हवी.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT