मुंबई: विद्यार्थ्यांना भडकावल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी हिंदुस्थानी भाऊला (Hidustani Bhau) अटक केली आहे. हिंदुस्थानी भाऊवर विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी भडकवल्याचा आरोप आहे. ‘हिंदुस्थानी भाऊ’चे खरे नाव विकास फाटक (Vikas Phatak) आहे. विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी भडकावल्याच्या आरोपाखाली या मुंबई पोलिसांनी (Mumbai-Police) हिंदुस्थानी भाऊ आणि इतरांविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला होता. (Know About Hindustani Bhau)
कोण आहे हा हिंदुस्थानी भाऊ ? (Who is Hindustani Bhau)
हिंदुस्थान भाऊचे खरे नाव विकास पाठक आहे. सोशल मीडियावर विकास फाटकला हिंदुस्थानी भाऊ म्हणून ओळखते. फाटक हा युट्युबर आहे आणि त्याच्या अश्लील विधानांमुळे तो नेहमीच चर्चेत असतो. याशिवाय भाऊने बिग बॉसच्या १३व्या सीझनमध्येही भाग घेतला होता. या सीझनमध्ये विकास फाटकशिवाय असीम रियाझ, शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला देखील खूप चर्चेत होते. हा सीझन सिद्धार्थ शुक्लाने जिंकला होता. गेल्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने सिद्धार्थने या जगाचा निरोप घेतला होता.
राज्य सरकारने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या बोर्ड परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या बोर्ड परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाव्यात यासाठी सोमवारी विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. हिंदुस्थानी भाऊने व्हिडिओद्वारे यासाठी बारावीच्या परीक्षा ऑनलाइन व्हाव्यात यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा दिला होता.
त्यानंतर मुंबईसह अनेक ठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर आले होते. जळगावातही (Jalgaon) शेकडोच्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बारावीच्या परीक्षा ऑनलाईन व्हाव्या या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला.
सोमवारी मुंबईतील धारावीमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. कोरोनाच्या संकटात 10वी आणि 12वीच्या परीक्षा ऑनलाइन कराव्यात, अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे. ऑफलाइन परीक्षा घेण्यास त्यांचा विरोध आहे. असेच प्रदर्शन सोमवारी नागपुरातही पाहायला मिळाले. तर मुंबईतही आंदोलक विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या धारावीतील येथील घराचाही घेराव घातला होता.
पोलिसांनीताबडतोब दखल घेवून सामंजस्यांची भूमिका घेत विद्यार्थ्यांना समजाविले. गोंधळ न करता त्यांनी मागणीचे निवेदन द्यावे, तसेच गर्दी न करता घरी जावे असे अवाहन केले. तसेच कारवाईचा ईशाराही दिला. कोणत्याही अवाहनाशिवाय हे सर्व विद्यार्थी हे अचानक पणे जिल्हाधिकारी कार्यालय समोर शेकडोंच्या संख्येने जमल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. मात्र, पोलिसांनी सयंमाची भूमिका घेत विद्यार्थ्यांना पागंविले.
विद्यार्थ्यांना भडकावण्याची बाबही सरकारने गांभीर्याने घेतली. गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पोलीस प्रशासनाला परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी स्वत: एकत्र जमू शकत नाहीत. हे निश्चितपणे काळजीपूर्वक नियोजन करुन हे आंदोलन गेले आहे. या प्रकरणाची आता चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.