Maharashtra Politics, Political News Updates, Maharashtra Political Crisis analysis  
मुंबई

'या खेळाचा खरा मास्टरमाईंट कोण?'

Maharashtra Politics | देशाच्या संविधानाला माननीय राज्यपाल पायदळी तुडवत आहेत.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यात गेल्या १० दिवसांपासून सुरु असलेल्या सत्तानाट्याला अखेर गुरुवारी पुर्णविराम लागला. बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या गटाने भाजपसोबत (BJP) एकत्र येत सरकार स्थापन केले. या नव्या सरकारवर शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी टीकास्त्र डागलं आहे. या सत्तानाट्याच्या मागे खरा मास्टरमाईंड कोण आहे, अशी विचारणाही त्यांनी केली आहे. इतकेच नव्हे तर राज्यपाल, विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. (Political News Updates)

काय म्हणाले अरविंद सावंत?

देशाच्या संविधानाला माननीय राज्यपाल पायदळी तुडवत आहेत. संविधान काय म्हणते ? सिंगल लार्जेस्ट पार्टीला सगळ्यात पहिल्यांदा सत्तास्थापनेसाठी बोलवायचं असतं. पण तुम्ही यांना काय म्हणून बोलवलतं? असा संतप्त सवाल शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी केला आहे. संविधानाचा खेळ मांडला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

सर्वोच्च न्यायालय जर असं वागत असेल तर आणखी काय बोलणार ? परवा वकील अभिषेक मनुसिंगवी यांनी न्यायालयात ज्या पद्धतीने मुद्दे मांडले ते पाहून न्याय मिळेल असं संपूर्ण देशाला वाटलं होतं. पण काय झालं, केंद्र सरकारकडे कोण बसवले जातात ? या घडामोडीं मागे खरा मास्टरमाईंड कोण आहे, असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला आहे.(Maharashtra Political Crisis)

सर्वोच्च न्यायालयात बंडखोर आमदारांवर अपात्रतेची याचिका आहे, त्यावर सुनावणी झालेली नसतानाही त्यांना शपथ कशी दिली जाते, असा सवाल अरविंद सावंत यांनी उपस्थित केला. न्यायालयात खटला प्रलंबित असताना त्याचा निर्णय आला नाही. देवेंद्र फडणवीस म्हणाले होते मी मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही. नंतर त्यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि मोदींचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं उपमुख्यमंत्री म्हणून तुम्ही शपथ घ्या, नाराजीने का असेना पण त्यांनी पक्षाचा आदेश मानला. पण ही आमची मंडळी आहेत त्यांना उद्धवजींनी कितीदा परत येण्याचे आवाहन केले. पण तरीही ते आले नाहीत, अशी खोचक टीकाही सावंत यांनी बंडखोर आमदारांवर केली.

आता पुन्हा राज्यपालांनी अधिवेशन बोलावलं आहे, कोणी सांगितलं हे अधिवेशन बोलवायला? राज्यपाल सांगतात त्यांना अधिकार आहेत? तुम्ही शपथ दिलीत ना? आता सरकार सांगेन अधिवेशन कधी बोलवायचं. अडीच वर्षांत त्यांनी राज्यपाल नियुक्त १२ आमदरांची फाईल पेंडिंग ठेवली. हे संविधान त्यांनी पायदळी तुडवलं, असही त्यांनी नमुद केलं.

उद्धवजींच्या शेवटच्या भाषणातून नागरिकांच्या डोळ्यातही अश्रू आले. वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राच्या पाठीत खंजीर खुपसला, अशी घणाघाती टिकाही सावंत यांनी केली. २०१९ मध्ये उद्धवजी वेगळं काय मागत होते, मग तेव्हाच हे सगळं का नाही केलं, अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा पहिल्या दिवशी देऊन ठेवतो, होल्डिंग लावतो, या दिवशी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार, असंही त्यांनी सांगितलं होत, आता एवढं सगळं दिलदारपणे स्विकारलं मग आता तुम्ही मुद्दाम हे असं केलं, शिवसेनेचे खच्चीकरण करण्याच भाजपचे उद्दिष्ट आहे, अशीही टीका अरविंद सावंत यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT