धनूरला तणाव कायम; शिवरायांच्या पुतळ्याची स्थिती ‘जैसे थे’

विनापरवानगी उभारणीमुळे प्रशासन-ग्रामस्थांमध्ये ओढाताण; आमदार पाटलांच्या हस्तक्षेपानंतर ठिय्या मागे
Crowd near Chhatrapati Shivaji Maharaj statue at Dhanur
Crowd near Chhatrapati Shivaji Maharaj statue at DhanurSarkarnama
Published on
Updated on

कापडणे : धनूर (Dhule) येथे शुक्रवारी मध्‍यरात्रीनंतर ग्रामपंचायतीलगत अश्‍वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा (Shivaji Maharaj Statue) पुतळा अज्ञातांनी उभारला. हा विनापरवानगी पुतळा हटविण्यावरून पोलिस (Police) व ग्रामस्‍थांमध्‍ये वाद सुरू आहे. महिलांनी पुतळा हटवू नये, यासाठी रात्रभर ठिय्या आंदोलन केल्याने दोन दिवसांपासून येथे तणावपूर्ण स्थिती आहे.

Crowd near Chhatrapati Shivaji Maharaj statue at Dhanur
महापालिकेसाठी मास्टरस्ट्रोक; शिवसेना उपनेतेपदी सुनील बागुल

सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जल्‍लोषात साजरी होताना धनूर (ता. धुळे) येथे मात्र महसूल व पोलिस प्रशासनाला अभूतपूर्व पेच प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे. सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्देशानुसार पुतळा समितीची स्‍थापना व विविध शासकीय परवानगी घेतल्‍यानंतर पुतळा उभारणीला मंजूर दिली जाते. परंतु, धनूर येथे विनापरवानगी छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारला. यामुळे पुतळा हटविण्यावरून हा वाद निर्माण झाला आहे.

Crowd near Chhatrapati Shivaji Maharaj statue at Dhanur
देवेंद्र फडणवीस आज महापालिका निवडणुकीचा बिगुल फुंकणार?

प्रशासनाने सरपंच सत्‍यभामाबाई शिंदे यांना नोटीसही बजावली. चर्चा सुरू असताना काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील व राष्ट्रवादीचे जिल्‍हा परिषद सदस्‍य किरण पाटील यांनी त्यात हस्तक्षेप केला. याबाबत तहसीलदारांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. काल सायंकाळी आमदार पाटील यांच्या मध्यस्थीनंतर ठिय्या आंदोलन स्थगित झाले. मात्र अद्यापही तणाव कायम आहे.

दरम्यान भाजपचे खासदार डॉ. सुभाष भामरे, माजी कृषी सभापती अरविंद जाधव व बापू खलाणे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मनोहर भदाणे, राम भदाणे, संजय वाल्हे, रितेश पाटील, मनोज मोरे आदी गावात दाखल झाले होते. पुतळ्यासाठी खासदार निधीतून दहा लाखांचा निधी देण्याचे त्यांनी घोषित केले. जिल्‍हा मराठा क्रांती मोर्चाचे मनोज मोरे, मराठा संघटनांचे प्रतिनिधी व शिवप्रेमी संघटनांचे पदाधिकारी घटनास्‍थळी दाखल झाले होते. ग्रामस्‍थांनी नियमांचे पालन करत सहकार्य करावे, असे आवाहन महसूल व पोलिस प्रशासनाने केले.

तर ग्रामपंचायत बरखास्त?

ग्रामपंचायत कार्यालयाच्या जागेत पुतळा बसविला आहे. पंचायतीने जबाबदारी नाकारून चालणार आहे. सहकार्य न केल्यास पंचायत बरखास्तीचाही निर्णय घेतला जाईल, असे एका जबाबदार अधिकाऱ्याने कालच्या बैठकीत सुनावल्यावर आम्हीच सामूहिक राजीनामा देवू, अशी भूमिकाही सदस्यांनी घेतली होती.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com