Rashmi Shukla News Sarkarnama
मुंबई

Maharashtra DGP : राज्याचे नवे पोलिस महासंचालक कोण,विवेक फणसळकर की रश्मी शुक्ला?

उत्तम कुटे

Pimpri Chinchwad News : राज्याचे पोलिस महासंचालक (डीजीपी) रजनीश सेठ हे या महिनाअखेरीस सेवानिवृत्त होत आहेत.त्या दिवशी रविवार असून उद्याची शनिवारची सरकारी सुट्टी ध्यानात घेऊन त्यांना शुक्रवारीच (ता.२९) राज्य पोलिस दलाच्या वतीने निरोप देण्यात आला. मुंबईतील नायगाव येथील पोलिस मैदानावर त्यांना मानवंदना देण्यात आली.दरम्यान, त्यांच्या जागी नवे डीजीपी म्हणून सध्या केंद्रांत प्रतिनियुक्तीवर असलेल्या रश्मी शुक्ला आणि मुंबईचे सीपी विवेक फणसळकर यांची नावे घेतली आहेत.

गृहखाते हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे असून शुक्ला या त्यांच्या अत्यंत मर्जीतील अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. त्यादृष्टीने विचार केला,तर त्यांचे पारडे जड दिसते आहे.आगामी लोकसभा निवडणूक विचारात घेता शुक्ला यांनाच डीजीपी केले जाईल,अशी चर्चाही आहे.

दरम्यान, त्याचीच पूर्वतयारी म्हणून शिंदे-फडणवीस सरकारने त्यांना त्यांच्याविरुध्द महाविकास आघाडी सरकारने नोंदविलेल्या गुन्हे आणि आरोपातून यापूर्वीच 'क्लीन चिट' दिली आहे. त्यातून त्यांचा रस्ता निर्धोक झाला आहे. दरम्यान,दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी,मात्र अद्याप त्यांच्या नावाला हिरवा कंदिल दिलेला नाही.

फणसळकर आणि शुक्ला हे दोघेही सध्या डीजीपी लेवलच्या पदावरच आहेत. मुंबईचे सीपी पद हे डीजीपी दर्जाचेच आहे. रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांना डीजीपीपेक्षा मुंबईचे सीपी बनवण्यात अधिक रस असल्याचे कळते. त्यामुळे फणसळकर यांना डीजीपी करून करून शुक्लांकडे मुंबईची धुरा सोपवली जाऊ शकते.

राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

परंतू,त्या महाराष्ट्रात परतल्या नाहीत, तर फणसळकर यांना डीजीपी करून मुंबईचे सीपीपद फडणवीस यांचे दुसरे विश्वासू अधिकारी मुंबईचे विशेष सीपी देवेन भारती यांना मिळू शकते. रजनीश सेठ यांच्याच बॅचच्या प्रज्ञा सरवदे आणि जयजितसिंग यांना रिटायरमेंटला सहा महिन्यांचा अवधी राहिलेला असल्याने त्यांच्या नावाचा विचार डीजीपी म्हणून केला जाईल का ही शंका आहे. त्यामुळे त्यानंतरच्या १९८९ च्या बॅचचे फणसळकर यांचा विचार त्यासाठी राज्य सरकार करू शकते. हे बहुधा उद्या कळणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT