Ajit Pawar Distribute Fund : अजित पवार झाले मेहेरबान, आमदार कोकाटेंना देणार 483 कोटींचा निधी...

Ajit Pawar Distribute Fund For Supporter MLA's : अजित पवारांकडून निधीवाटपात दुजाभाव केला जात आहे का?
Ajit Pawar Distribute Fund
Ajit Pawar Distribute FundSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बंड करत, पक्षाच्या बहुतांश आमदारांना सोबत घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार शिंदे -फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. बहुतांश आमदारही विकासकामांच्या निधी मिळवण्यासाठी अजित पवार यांच्यासोबत गेले. आता त्याची फळे आमदारांना मिळू लागली आहेत. सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या मतदारसंघात 483 प्रकल्पाला अर्थमंत्री अजित पवारांनी दिले आहे. (Latest Marathi News)

Ajit Pawar Distribute Fund
अमोल कोल्हेंविरोधात अजित पवार गटाला कोण बोलायला लावतंय ? | Amol Kolhe Akrosh Morcha News

अजित पवार यांच्यावर विरोधकांकडून निधी मंजूर करताना दुजाभाव केल्याचा आरोप सातत्याने होत असतो. यामुळे शिंदे गट अन् भाजपचे आमदार नाराज आहेत, अशा बातम्या अधून - मधून येत असतात. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांवर निधीचा वर्षाव होत आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात देखील अजित पवारांच्या आमदारांना पुरवणी मागण्यांद्वारे मोठा निधी मिळाला होता. त्यानंतर सातत्याने विकासकामांना मंजुरीचा धडाका लावल्याने, विधानसभा निवडणुकीची सोय करण्याचे जोरदार प्रयत्न यानिमित्ताने होत आहेत.

आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या वासाळी (ता. इगतपुरी) येथील स्मारकाच्या उभारणीसाठीच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मंत्री दिलीप वळसे- पाटील, आमदार कोकाटे, नितीन पवार, मंजुळा गावित, नितीन भुसारा आदी यावेळी उपस्थित होते. आद्यक्रांतिकारक भांगरे यांचे आदिवासी समाजात खूप मोठे स्थान आहे. त्यामुळे झारखंड येथील बिरसा मुंडा स्मारकाच्या धर्तीवर हे स्मारक भव्यदिव्य बनवावे, अशी मागणी आमदार कोकाटे यांनी केली. त्यास अजित पवार यांनी तत्काळ मंजुरी दिली.

Ajit Pawar Distribute Fund
NCP Politics: अजित पवारांनी दिला भुजबळांच्या भात्यात आणखी एक बाण !

या स्मारकाच्या कामासाठी जागेची निश्चिती करणे व यासंबंधित इतर बाबींची चर्चा करण्यासाठी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची बैठक उद्या शनिवारी (ता.30) सकाळी अकराला खेड येथे यांच्या निवासस्थानी होणार आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com