MLA Ajay Chaudhary, uddhav thackeray, Sudhir Salvi Sarkarnama
मुंबई

Shivadi Assembly Election : शिवडीत ठाकरे सेनेचा उमेदवार कोण? इच्छुकांमध्ये रंगलं 'पोस्टर वॉर'

Shivsena UBT Shivadi Assembly constituency : शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या शिवढी विधानसभा मतदारसंघात सध्या विद्यमान आमदार आणि इच्छुक उमेदवारांमध्ये पोस्टर वॉर रंगलं आहे. आमदार अजय चौधरी आणि इच्छुक उमेदवार सुधीर साळवी यांच्या समर्थकांकडून वेगवेगळ्या आशयाची पोस्टर्स व्हायरल केली जात आहेत.

Jagdish Patil

Shivadi Assembly constituency : शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या शिवढी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार आणि इच्छुक उमेदवारांमध्ये पोस्टर वॉर रंगलं आहे. विद्यमान आमदार अजय चौधरी आणि इच्छुक उमेदवार सुधीर साळवी यांच्या समर्थकांकडून वेगवेगळ्या आशयाची पोस्टर्स व्हायरल केली जात आहेत.

'जो मातोश्रीचा आदेश, तोच शिवडीचा उमेदवार, शिवडी विधानसभेत मशाल धगधगणार' 'आपला उमेदवार मशाल', अशा आशयाचे पोस्टर आमदार अजय चौधरी (MLA Ajay Chaudhary) समर्थकांकडून व्हायरल केले जात आहेत.

तर 'संघर्षात साथ जनतेची मला भीती नाही विरोधकांची' अशा आशयाचे पोस्टर सुधीर साळवींच्या (Sudhir Salvi) समर्थकांकडून व्हायरल केले जात आहेत. त्यामुळे या मतदारसंघात उमेदवारीसाठी पक्षात चांगलीच चढाओढ असल्याचं पाहायला मिळत आहे.

मात्र, शिवडी (Shivdi) विधानसभा मतदारसंघातला ठाकरे गटाचा उमेदवार कोण असणार याचा सस्पेन्स अद्याप कायम आहे. नुकतंच दोन दिवसांपूर्वी मातोश्रीवर विद्यमान आमदारांची महत्वाची बैठक बोलवण्यात आली होती. मात्र, बैठकीला मुंबईतील (Mumbai) दोन विद्यमान आमदार अजय चौधरी आणि प्रकाश फातर्पेकर यांना निमंत्रण देण्यात आलं नव्हतं, अशी माहिती आहे.

त्यामुळे या दोन आमदारांची उमेदवारी धोक्यात असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच आता शिवडी विधानसभेतील पदाधिकाऱ्यांमध्ये आपापसात पोस्टर वॉर रंगल्यामुळे या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेकडून (Shivsena) नेमकी कोणाला उमेदवारी दिली जाणार याकडे नजरा लागल्या आहेत. शिवाय इच्छुकांना उमेदवारी न दिल्यास ते बंडखोरी करणार की पक्षाच्या आदेशाचं पालन करणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.

सुधीर साळवींच्या नावाची चर्चा

शिवडी मतदारसंघातून लालबागचा राजा मंडळाचे पदाधिकारी सुधीर साळवींच्या नावाची चर्चा आहे. कारण लोकसभा निवडणुकी दरम्यान ठाकरे गटाने त्यांची लोकसभा समन्वयक म्हणून नियुक्ती केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT