Devendra Fadnavis, Amit Shah, Eknath Shinde, Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Amit Shah : महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण? अमित शाह म्हणाले, "सध्या एकनाथ शिंदे..."

Maharashtra Assembly Election 2024 : राज्यातील विधानसभेच्या निवडणुका अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. तरीही अद्याप महाविकास आघाडी आणि महायुतीकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्यात आलेला नाही. शिवाय मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून दोन्हीकडे वाद सुरू असल्याचं लपून राहिलेलं नाही.

Jagdish Patil

Maharashtra Assembly Election 2024 : राज्यातील विधानसभेच्या निवडणुका अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. तरीही अद्याप महाविकास आघाडी आणि महायुतीकडून (Mahayuti) मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्यात आलेला नाही.

शिवाय मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून दोन्हीकडे वाद सुरू असल्याचं लपून राहिलेलं नाही. अशातच आता राज्यात महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? या प्रश्नाचं उत्तर भाजपचे वरिष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी दिलं आहे.

अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत रविवारी (ता. 10 नोव्हेंबर) भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा ( BJP manifesto) प्रकाशित करण्यात आला. या वेळी भाजपकडून राज्यातील जनतेला 25 आश्वासनं देण्यात आली. यामध्ये लाडक्या बहिणींना प्रति महिना 2100 रुपये, शेतकऱ्यांची कर्जमाफी, वृद्धांना पेन्शन यासह अनेक आश्वासनं देण्यात आली.

जाहीरनामा प्रकाशित केल्यानंतर अमित शाह (Amit Shah) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी, महायुतीचे सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? असा प्रश्न विचारला असता शाह म्हणाले, "सध्या महायुतीचं नेतृत्व एकनाथ शिंदे (Eknath Shinde) करत आहेत. निवडणूक त्यांच्याच नेतृत्वाखाली लढवली जात आहे. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार? हे तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील."

तसंच यावेळी त्यांनी युतीचं सरकार राज्यात येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, महाराष्ट्रात आमचं महायुतीचं सरकार येणार. तसंच मी महाराष्ट्रातील जनतेला सलग तिसऱ्यांदा महायुती सरकारला जनादेश देण्याचं आवाहन करत आहे.

काँग्रेस आश्वासनं पूर्ण करत नाही

यावेळी त्यांनी काँग्रेसच्या आश्वासनांमध्ये विश्वासार्हता राहिली नसल्याची टीका केली. ते म्हणाले, "काँग्रेसने आश्वासनं देताना विचारपूर्वक केली पाहिजेत, कारण ते आश्वासनं पूर्ण करत नाहीत. तेलंगणा, हिमाचल ही त्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे त्यांच्या आश्वासनांमध्ये विश्वासार्हता राहिलेली नाही."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT