Maharashtra Assembly Election : मुंबईतील पत्रकार परिषदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षाचं संकल्पपत्र प्रकाशित करण्यात आलं. या संकल्पपत्रात कोणत्या योजनांचा समावेश असणार याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. (Manifesto of Maharashtra BJP)
महायुतीचं (Mahayuti) सरकार सत्तेवर आल्यास लाडक्या बहिणींना पंधराशे ऐवजी महिन्याला 2100 रुपये देणार असल्याची घोषणा फडणवीसांनी केली. तसंच यावेळी त्यांनी राज्यात 25 लाख रोजगार निर्मिती करणार असंही आश्वासन दिलं आहे. तसंच यावेळी त्यांनी आम्ही शेतकरी, महिला आणि युवांना डोळ्यांसमोर ठेवून योजना जाहीर केल्याचं सांगितलं.
हे संकल्पपत्र जाहीर करताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, हे संकल्पपत्र म्हणजे विकसित भारतासाठी विकसित महाराष्ट्र तयार करण्याचा रोडमॅप आहे. या आधी 2019 मध्ये आम्ही संकल्पपत्र तयार केल्यानंतर रिपोर्ट कार्डही दिलं होतं. भाजपसाठी संकल्पपत्र म्हणजे कागद नाही तर पूर्ण ताकदीने काम करण्यासाठी पवित्र संकल्प आहे. महाराष्ट्राचा विश्वास हा भाजप व महायुतीवर असल्याचंही ते यावेळी म्हणाले.
लाडक्या बहिणींना पंधराशे ऐवजी महिन्याला 2100 रुपये देणार.
वृद्ध पेन्शनधारकांना महिन्याला 2100 रुपये देणार.
अंगणवाडी आणि आशा सेवकांना १५ हजारांचं विमा संरक्षण.
25 लाख रोजगार निर्मिती करणार.
शेतमालाची हमीभावाने खरेदी करणार.
शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार.
वीज बिलात 30 टक्के कपात करुन सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्यात येईल
सरकार स्थापनेनंतर शंभर दिवसांच्या आत 'व्हिजन महाराष्ट्र 2024 सादर करण्यात येईल, अशा अनेक घोषणा यावेळी फडणवीस यांनी केल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.