Eknath Shinde-Uddhav Thackeray
Eknath Shinde-Uddhav Thackeray  Sarkarnama
मुंबई

Shinde vs Thackeray : निवडणूक आयोगासमोर ठाकरे-शिंदे गटांच्या वकीलांमध्ये शाब्दिक चकमक

सरकारनामा ब्यूरो

Shinde vs Thackeray : धनुष्यबाण कुणाला मिळणार? याबाबतची महत्वाची सुनावणी आज (ता.20 जानेवारी) केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुरू आहे. या दरम्यान दोन्ही गटाकडून आयोगासमोर जोरदार युक्तीवाद करण्यात आला. याच दरम्यान, महेश जेठमलानी आणि देवदत्त कामत यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाल्याचे समोर आले आहे. प्रतिनिधी सभेच्या युक्तीवादावरून जेठमलानी आणि कामत यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली.

केंद्रीय निवडणूक आयोगात दोन्ही बाजुच्यावतीने जोरदार युक्तिवाद करण्यात येत आहे. शिंदे गट राजकीय पक्ष नाहीये. शिंदे गटाची राष्ट्रीय कार्यकारिणी बेकायदेशीर आहे. ते गुवाहाटीला का गेले? असा सवाल यावेळी ठाकरे गटाच्यावतीने उपस्थित करण्यात आला. तसेच कपिल सिब्बल यांनी शिंदे गटाच्या याचिकेतील मुद्दे खोडण्याचा प्रयत्न केला.

यांचे बंड झाले तर मग एक महिना आयोगाकडे येण्यासाठी का लागला? असा सवालही यावेळी करण्यात आला. राष्ट्रीय कार्यकारिणी आमच्यासोबत आहे. शिंदे गटाची राष्ट्रीय कार्यकारिणी बेकायदेशीर आहे, तर ठाकरे गटाची कार्यकारिणी बरखास्त होऊ शकत नाही. ठाकरेंची कार्यकारिणी घटनेप्रमाणे असल्याचे यावेळी ठाकरे गटाच्यावतीने आयोगाला सांगण्यात आलं.

याच दरम्यान दोन मुद्दे ठाकरे गटाच्यावतीने उपस्थित करण्यात आले. राष्ट्रीय कार्यकारिणीला मुदतवाढ द्या, किंवा निवडणूक घ्या, अशी मागणी ठाकरे गटाच्यावतीने करण्यात आली. तसेच एकनाथ शिंदेंचे प्रतिज्ञापत्र तपासून पाहा, दोन्ही ठिकाणी आमचे संख्याबळ जास्त आहे. सभागृहांमध्ये देखील आमचे स्थान आहे. तसेच पक्षप्रमुख पदाला मुदतवाढ द्या, अशी मागणी ठाकरे गटाच्यावतीने आयोगात करण्यात आली.

तसेच घटनेनुसार प्रतिनिधी सभा आमच्याकडे आहे. शिंदे गटाकडे प्रतिनिधी सभा नाही. शिंदे गटाच्या कागदपत्रांमध्ये कमतरता असून 61 पैकी 28 जिल्हाप्रमुखांची प्रतिज्ञापत्र नाहीत. शिंदे गटाने लोकशाहीनुसार म्हणणे मांडायला पाहिजे होते. असे न करता ते गुवाहाटीला का गेले? पक्षाच्या सभेला उपस्थिती न लावता ते गुवाहाटीला गेले. त्यामुळे राजकीय पक्ष म्हणून शिंदे गटाने कोणती कागदपत्रे सादर केली का? मग शिंदे गट हा राजकीय पक्ष नाही. ठाकरे गटच खरी शिवसेना आहे, असा युक्तीवाद सिब्बल यांच्याकडून आयोगासमोर करण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT