Palghar Nagar Parishad Sarkarnama
मुंबई

Palghar Nagar Parishad : पालघर नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवकांच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार ?

Thackeray Group & Shinde Group : शिंदे गट आणि ठाकरे गटात रस्सीखेच

सरकारनामा ब्यूरो

प्रकाश पाटील

Palghar : पालघर नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी गुरुवारी(दि.13) होत आहे. या निवडणुकीसाठी चार उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत. यात दोन शिवसेना शिंदे गट तर उद्धव ठाकरे गटाचे दोन उमेदवारी अर्ज आहेत. याविरुद्ध परस्परांनी आक्षेप नोंदवला आहे. आता यावर अद्याप जिल्हाधिकाऱ्यांनी कोणताही निर्णय दिलेला नाही. परस्पर आता निवडणुकीच्यावेळी पीठासन अधिकाऱ्याकडे निर्णय दिला जाईल अशी माहिती समोर येत आहे.

पालघर नगरपरिषदेमध्ये शिवसेना 14, भाजपा सात, अपक्ष पाच व राष्ट्रवादी नगराध्यक्षासह तीन असे पक्षीय बलाबल आहे. पालघर शिवसेनेत अद्यापतरी फूट पडलेली नाही. तरी देखील उद्याच्या निवडणुकीनंतरच काय ते चित्र स्पष्ट होणार आहे. आता गुरुवारी(दि.१३) निवडणुकीत स्वीकृत सदस्य कोणत्या गटाचे निवडून येतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

शिवसेना शिंदे गट तर उद्धव ठाकरे गटाचे दोन उमेदवारी अर्ज आहेत. याविरुद्ध परस्परांनी आक्षेप नोंदवला आहे. याबाबत छाननी अधिकारी म्हणून काम पाहणारे जिल्हाधिकारी यांनी निर्णय घेऊन तो निर्णय उद्याच्या निवडणूक पीठासन अधिकार्‍याकडे निर्णय परस्पर पाठविला जाणार आहे. बुधवारी(दि.१२) संध्याकाळी उशिरापर्यंत या आक्षेपाची सुनावणी सुरू होती.

स्वीकृत नगरसेवकांसाठी शिंदे गट शिवसेनेतर्फे रईसखान व ॲडव्होकेट धर्मेंद्र भट्ट यांचे अर्ज शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संख्ये यांच्यातर्फे दाखल करण्यात आले. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सुनील महेंद्रकर व मनोज घरत यांचे अर्ज शिवसेनेचे गटनेते कैलास म्हात्रे यांच्या शिफारसी वरून व दोन विद्यमान नगरसेवकांच्या सूचक अनुबोधकसह दाखल केले आहेत.(Latest Marathi News)

कैलास म्हात्रे यांना शिवसेने(Shivsena)ने गटनेते पदावरून शिंदे गट शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाने गटनेते पदावरून हटविले आहे. कैलास म्हात्रे हे शिवसेनेतून निवडून आलेले आहेत. सेनेचे दोन गट झाल्यामुळे उद्धव गटाचे असल्याने त्यांची गटनेत्यावरून काढून टाकल्याची नोटीस त्यांना व नगरपरिषदेला दिली आहे.

हे कारण देऊन आक्षेप नोंदवण्यात आला तर स्वीकृत नगरसेवकांसाठी विद्यमान सदस्यांची शिफारस आवश्यक असल्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे(Uddhav Thackeray) गटाकडून नमूद करून आक्षेप घेण्यात आला आहे. आता यावर अजून तरी जिल्हाधिकाऱ्यांनी कोणताच निर्णय दिलेला नाही. परस्पर उद्या निवडणुकीच्या वेळी पीठासन अधिकाऱ्याकडे निर्णय दिला जाईल असे सांगण्यात आले.

स्वीकृत नगरसेवकाची पात्रता ही सामाजिक संस्थेच्या पदाधिकारी ही सदस्य यावरून वेगवेगळे प्रवाह पुढे आले असून त्याबद्दल दोन्ही बाजूने वेगवेगळे दाखले जोडले आहेत. तर माझी उपनगराध्यक्ष रहीस खान यांच्या पूर्वीच्या कार्यकाळात लेखापरीक्षणात काही रकमेची वसुली शिल्लक असल्याचे सांगत त्याविषयी आक्षेप नोंदवला.

या चारही आक्षेपाविषयी जिल्हाधिकारी निर्णय घेऊन या निवडणुकीचे पीठासन अधिकारी नगराध्यक्ष डॉ. उज्वला काळे यांच्याकडे तसेच नगरपरिषदेकडे निर्णय पाठवणार असल्याचे सांगितले. त्यामुळे या स्वीकृत नगरसेवकांच्या निवडणुकी बाबतची उत्सुकता कायम राहिली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT