Pune Politics News : शिवतारे-आढळरावांच्या मनसुब्यावर रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराने फेरले पाणी

Shivajirao Adhalrao Patil, Vijay Shivtare : पुणे जिल्ह्यातील कार्यक्रम रद्द झाल्याने चर्चा
Eknath Shinde Shivajirao Adhalrao Patil, Vijay Shivtare News
Eknath Shinde Shivajirao Adhalrao Patil, Vijay Shivtare NewsSarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde News : राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही (Devendra Fadnavis) दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. या सर्व घडामोडींमुळे पुणे जिल्ह्यातील जेजुरी-मंचरचा मुख्यमंत्री शिंदे यांचा कार्यक्रम रद्द केल्याचे आदेश आले आहेत.

अर्थात मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारीला लागलेले माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) व माजी खासदार शिवाजीराव आढळराव (Shivajirao Adhalrao Patil) या दोघांच्याही आगामी विधानसभा-लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी प्रोजेक्शनवर पाणी फेरले असे म्हणता येणार आहे. गेल्या वर्षभरापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळाचा विस्तार रखडलेला असून तो कधी होणार असे म्हणता म्हणता या मंत्रीमंडळात राष्ट्रवादीने कधी चंचुप्रवेश केला तो राज्याच्याही लक्षात आले नाही.

Eknath Shinde Shivajirao Adhalrao Patil, Vijay Shivtare News
Cabinet Expansion 2023 : तीन इंजिनचे सरकार मजबूत, पण केव्हाही कोसळू शकते; शिंदे गटातील आमदाराच्या वक्तव्याने खळबळ

मागील काही दिवसात राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेवून कारभार हातात घेतला खरे पण त्यांनाही खातेवाटप झाले नसल्याने बिनाखात्याचे मंत्री आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमिवर पुणे जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिका-यांना निरोप देवून शुक्रवारी (ता.12 जुलै) होणारे जेजुरी व मंचर येथील कार्यक्रम रद्द केल्याचे सांगण्यात आले.

Eknath Shinde Shivajirao Adhalrao Patil, Vijay Shivtare News
Mantrimandal Vistar News : अखेर मंत्रिमंडळ विस्ताराचा वार ठरला... 'या' दिवशीचे मुख्यमंत्र्यांचे सर्व कार्यक्रम रद्द

पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे शासन आपल्या दारी कार्यक्रम भरगच्च घेवून आपल्या राजकीय अस्तीत्वाची आणि थेट आव्हानाची चुणूक दाखविण्याची तयारी शिवतारे यांनी केली होती. तर दुसरीकडे भाजपा (BJP)-सेना-राष्ट्रवादीच्या नव्या अभिनव महायुतीकडून आपणच लोकसभेचे उमेदवार म्हणून कंबर कसलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी आपल्या आगामी उमेदवारीचे शिंग फुंकण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांना जेजुरी-मंचरमध्ये पाचारण केले होते. मात्र, दोघ्यांच्याही इराद्यावर पाणी सोडण्याचे काम मंत्रिमंडळ विस्ताराने झाले असेच आता या निमित्ताने म्हणता येणार आहे.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com