Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkaranama
मुंबई

Dasara Melava : कुणाच्या मेळाव्याला जास्त गर्दी? पाहा पोलिसांची आकडेवारी!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : दसराच्या पार्श्वभूमीवर इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेचे दोन मेळावे पार पडले. मेळाव्यात गर्दी जमवण्यासाठी चढाओढ लागली होती. आमच्याच मेळाव्याला सर्वात जास्त गर्दी होईल असा दावा केला जात होता. यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत पोहचले होते. तर नेत्यांकडून कार्यकर्त्यांची मुंबईत पाठवणी होत होती. आता गर्दीच्या आकड्याबाबत पोलिसांकडून दावा केला जात आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर सुमारे ६५ ते ७० हजार लोकांनी उपस्थिती दर्शवल्याचे पोलिसांकडून दावा केला जात आहे. शिवाजी पार्क मैदानाची प्रक्षकांना सामावून घेण्याची क्षमता सुमारे ५५ ते ६० हजार आहे. पोलिसांच्या अंदाजानुसार मैदान तुंडुंब भरले होते. बरेच लोक मैदानात उपस्थित होते, तर बरेच लोक मैदानाबाहेरही उभे होते.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही मुंबईत बीकेसीच्या एमएमआरडीए मैदानावर दसरा मेळावा पार पडला. या मैदानाची लोकांना सामावून घेण्याची क्षमताही दीड लाखाच्या जवळपास असावी, असे समजले जाते. या निकषानुसार मुख्यमंत्री यांच्या सभेला ९० ते १ लाख लोक आले असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला केला आहे.

यामुळे आता गर्दी जमवण्याच्या बाबतीत शिंदे गटाने ठाकरेंवर मात केली का? अशी चर्चा होत आहे. मात्र ठाकरे आणि शिंदे गटाकडून गर्दींच्या आकड्यांच्या बाबतीत वेगवेगळे दावे केले जात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT