"शिवसेनेत जसे साबिर शेख होते, तसे हिंदुत्वाचे शिलेदार अब्दुल सत्तार" ; शिंदेंनी केली प्रशंसा

Abdul Sattar : ज्ञानेश्वरी, रामदास, तुकोबारायांचे काव्य- अभंग साबिरभाईंच्या तोंडपाठ होते.
Ekanath Shinde Abdul Satttar
Ekanath Shinde Abdul SatttarSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मुंबईच्या बीकेसी मैदानावर काल दसऱ्याच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मेळावा पार पडला. शिंदेंनी भाषणात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर जोरदार प्रहार केला. बीकेसीवर एकनाथ शिंदेची तोफ कोणावरधडधडणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. बीकेसी सारखे मोठे मैदान गर्दीने खचून भरले होते. शिंदेंनी लिहून आणलेले मुद्दे आणि केलेल्या भाषणाची चर्चा झाली. (Cm Shinde Dasara Melava)

यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदेंनी दिवंगत शिवसैनिक साबिर शेख यांचा उल्लेख केला. शिवसेनेच्या प्रखर हिंदुत्वाचे शिलेदार जसे शिवसैनिक साबिर शेख होते, तसेच आमच्यासोबत हिंदुत्वाचे शिलेदार अब्दुल सत्तार आहेत.अब्दुल सत्तार हे आमच्याकडचे हिंदुत्ववादी सत्तार आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी सत्तारांची प्रशंसा केली.

Ekanath Shinde Abdul Satttar
दसरा मेळावा : गर्दी जमली, पण भाषणं जमले नाही..

कोण होते साबिर शेख ?

साबीर शेख मूळ पुणे जिल्ह्यातील नारायणगावचे. साबीरभाई मुसलमान असले त्यांच्या घरात प्रवचन आणि अध्यात्माची परंपरा सुरू होते. साबीरभाई वडील प्रवचनकार होते. अशा वातावरणामुळे साबीरभाईंना संतसाहित्यात रूची निर्माण झाली.

ज्ञानेश्वरी असो, रामदास, तुकोबारायांचे काव्य- अभंग त्यांना तोंडपाठ होते. त्यांच्या गावापरिसरातली शिवनेरी, हरिश्चंद्रगड, नारायणगड, ढाकोबा अशा अनेक गडकिल्ल्यांच्या वास्तव्यात ते वाढले. शिवछत्रपतींच्या इतिहासाबद्दल त्यांना आकर्षण होते. आपल्या संस्कृतीची त्यांना आवड होती.

Ekanath Shinde Abdul Satttar
Dasara Melava : सुषमा अंधारेंनी गाजवली सभा, सोशल मिडीयावर भाषणाची जोरदार चर्चा!

महाराष्ट्रात जेव्हा पहिल्यांदा शिवसेनेचे सरकार आले, तेव्हा खुद्द बाळासाहेबांनी साबीर भाईंना कामगार मंत्रालयाची जबाबदारी दिली. त्यांनी स्वतः कामगार म्हणून काम केले होतो.मंत्रीपदावर असताना अनेकदा व्यवस्थेविरोधात जाऊन त्यांनी कामगारांची बाजू घेतली.

मंत्री राहिलेल्या, तीन वेळा आमदार राहिलेल्या साबीर भाई शेख यांनी स्वतःसाठी मात्र काही पैसा, संपत्ती जमवून ठेवली नाही.आमदार असतानाही ते कल्याण येथे चाळीत वास्तव्य करत होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com