Why Milind Deora Left Congress news Sarkarnama
मुंबई

Milind Deora News: काँग्रेस का सोडली? चार महिन्यानंतर ठाकरेंकडे बोट दाखवत देवरांनी सांगितले कारण...

Why Milind Deora Left Congress: एकनाथ शिंदे यांनी मला राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवले आहे. त्यामुळे मी आनंदी आहे. यामिनी जाधव या लढवय्या आहेत. त्यांचा विजय नक्कीच आहे.

Mangesh Mahale

Milind Deora News, 22 May: काँग्रेसला सोडचिठ्ठी का दिली, याचा खुलासा चार महिन्यानंतर भाजपचे राज्यसभा खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी केला आहे. यापूर्वी काँग्रेस सोडताना हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनीही मित्रपक्षांवर गंभीर टिका केली होती.

राष्ट्रवादी आणि अजित पवार यांच्यावर त्यांनी ताशेरे ओढले होते. हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. अशाच प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेले मिलिंद देवरा यांनीही काँग्रेस कशामुळे सोडली हे सांगताना उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्याकडे बोट दाखवले आहे.

देवरा म्हणाले, "उद्धव ठाकरे यांनी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी प्रचंड दबाव टाकल्याने काँग्रेसने ही जागा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला सोडली. त्यामुळेच मला काँग्रेस सोडावी लागली, असे देवरा यांनी स्पष्ट केले. देशातील सर्वांत उत्तम लोकसभा मतदारसंघ म्हणून दक्षिण मुंबई मतदारसंघाची ओळख आहे. मी जेव्हा काँग्रेसमध्ये होतो, तेव्हा हा मतदारसंघ सोडू नये, असे मी स्पष्ट शब्दांत काँग्रेस पक्षश्रेष्ठींना सांगितले होते. पण ठाकरेंनी काँग्रेस पक्षावर दबाब आणून ही जागा आपल्याकडे घेतली. त्यामुळे मी काँग्रेसमधून बाहेर पडलो, असे देवरा म्हणाले. "माझ्यासाठी काँग्रेस आता भूतकाळ आहे. मला आता भविष्याकडे बघायचे आहे," अशा भावना देवरा यांनी व्यक्त केल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवले आहे. त्यामुळे मी आनंदी आहे. शिवसेनेच्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार यामिनी जाधव या लढवय्या आहेत. त्यांचा विजय नक्कीच आहे," असा विश्वास मिलिंद देवरा यांनी व्यक्त केला.

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून मिलिंद देवरा यांना शिंदे गटाकडून उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा होती, त्यावर "माझी कुठेही घालमेल नव्हती," असे स्पष्टीकरण देवरा यांनी दिले आहे. वीस मे रोजी राज्यात झालेल्या मतदानावर उद्धव ठाकरे यांनी टिका केली होती. त्याला देवरांनी उत्तर दिले आहे. "मतदान संथ गतीने झाले असे म्हणण्यात अर्थ नाही. आपला पराभव लपवण्यासाठी ते या पद्धतीचे विधान करीत आहेत, असेही देवरा म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT