Raj thackeray, devendra fadnavis Latest News
Raj thackeray, devendra fadnavis Latest News  sarkarnama
मुंबई

महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्येच का जातात?; राज ठाकरेंचा सवाल...

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राज्यात येणारे उद्योग बाहेर गेल्याने एकच खळबळ माजली आहे आणि यावरून चांगलचं राजकारण रंगल आहे. यावर विविध पक्षातील नेते आपली प्रतिक्रिया देत आहेत. यावरून याता मनसेही आक्रमक होतांना दिसत असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील उद्योग हे एकाच राज्यात म्हणजे गुजरातमध्येच का जातात, असा सवाल उपस्थित करून शिंदे-फडणवीस सरकारला प्रश्न विचारला आहे.

दरम्यान, यावरूनच मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनीही आपली प्रतिक्रिया देत शिंदे गटाला टोला लगावला आहे. मात्र त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची बाजू घेतली आहे. (Raj thackeray, devendra fadnavis Latest News)

राज्यातील वेदांता-फॉक्सकॉन त्यानंतर टाटा एअरबस हे प्रकल्प महाराष्ट्र मधून गुजरातला गेले आणि त्यानंतर महाराष्ट्रात एकच राजकारण पेटले आहे. महाविकास आघाडी आणि शिंदे-फडणवीस सरकार यांच्यामधील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही आहेत.

बाळासाहेबांची शिवसेना ( शिंदे गट ) यांच्याकडून डोंबिवलीत उद्धव ठाकरे यांच्या विरोधात विविध ठिकाणी बॅनर झळकवले आहेत. 'उद्धवचा वाटा, महाराष्ट्राचा घाटा' अशा आशयाचे बॅनर शिंदे गटामार्फत लावण्यात आले आहेत. या बॅनरवर महाराष्ट्रातून किती प्रकल्प कधी आणि कुठे गेले आहेत, त्याच्या नावाची यादी प्रसिद्ध करून उद्धव ठाकरे यांना लक्ष करण्यात आले आहे.

आता याच प्रकल्पावरून मनसे आमदार राजू पाटलांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, याबाबत एकमेकांवर आरोप करण्यात काही अर्थ नाही. मागच्या सरकारमध्ये आताचे काही मंत्री होते. ते उद्योग का गेले हा संशोधनचा विषय आहे, एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा या सरकारने किती उद्योग आणले ते समोर यायला पाहिजे. मला वाटत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की २५ हजार कोटींची उद्योग आणलेत. मात्र मागच्या सरकार मध्ये तसे काही दिसलेले नाही आहे. मात्र काही उद्योग गेले हे तेवढेच खरे आहे.

दरम्यान, आज राज ठाकरे यांनी राज्याबाहेर जाणाऱ्या उद्योगावरून शिंदे-फडणवीस सरकारच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ते म्हणाले की, राज्यातील उद्योग का जातात आणि एकाच राज्यात का जातात यांचे संशोधन करायला हवे. त्यांच्या या टीकेला आता सत्ताधारी पक्षातील नेते काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT