NCP : गुजरातला उद्योगांचा पेटारा, तर महाराष्ट्रातील बेरोजगारांच्या हाती कटोरा !

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देत आंदोलनाला सुरुवात केली. पण फडणवीस यांच्या घराजवळ पोहोचण्यापूर्वीच पोलिसांना आंदोलकाना ताब्यात घेतले.
NCP Agitation
NCP AgitationSarkarnama
Published on
Updated on

नागपूर : राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला नेत असल्याचा आरोप करत नागपुरात (Nagpur) आंदोलन करण्यात आले. शहरातील चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्क येथून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देत आंदोलनाला सुरुवात केली. पण फडणवीस यांच्या घराजवळ पोहोचण्यापूर्वीच पोलिसांना आंदोलकाना ताब्यात घेतले.

शिंदे-फडणवीस सरकार हे महाराष्ट्रात सत्तेत आल्यापासून गुजरातला (Gjurat) उद्योगांचा पेटारा देऊन महाराष्ट्रातील (Maharashtra) बेरोजगार तरुणांच्या हाती कटोरा देण्याचे काम करीत असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांनी केला. आज येथे आंदोलन करतोय भविष्यात उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या सागर बंगल्यावरही आंदोलन करू, असा इशारा त्यांनी यावेळी दिला

नागपूरमध्ये प्रस्तावित टाटाचा एअरबस प्रकल्प गुजरातला हलवल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाली. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरावर धडक आंदोलन करण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेऊन फडणवीसांच्या घराजवळ जाण्याचा त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केले. यात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, राकाँयुकाचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन भटारकर, शहर अध्यक्ष शैलेंद्र तिवारी यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले होते. धरमपेठ येथील ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्क येथून मोर्चा काढण्यात आला. आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. उपमुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा जाणार असल्याने पोलिसांनी याची आधीच खबरदारी घेऊन कडक बंदोबस्त ठेवला होता.

NCP Agitation
मोहोळमधून संधी मिळाली नसती, तर आज मी माळशिरसचा आमदार असतो : राष्ट्रवादी आमदार मानेंचा गौप्यस्फोट

मोर्चा निघताच पोलिसांनी धरपकड सुरू केली. सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेणे सुरू केले. सर्वांना पोलिस व्हॅनमध्ये घेऊन गेले. यावेळी मेहबूब शेख म्हणाले, एका पाठोपाठ महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला नेले जात आहे. ते पुन्हा राज्यात पुनर्स्थापित केले जात नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहील. आंदोलनात प्रामुख्याने सौरभ मिश्रा, नूतन रेवतकर, महेंद्र भांगे, सुखदेव वंजारी, शशिकांत ठाकरे,अमोल पारपल्लीवार, सय्यद सुफियान,आशिष पुंड, पूनम रेवतकर,अनिल बोकडे, प्रणय जांभुळकर, अशोक काटले, कपिल आवारे, प्रणव म्हैसेकर, राहूल पांडेय, रोशन निर्मलकर, अमित पिचकाटे, सुमित बोडखे पाटील, विश्वजित सावडिया, विजय गावंडे, दिनेश गावंडे, पिंकी शर्मा, अजहर पटेल, तुषार कोल्हे, रियाज शेख, साबिर अली,जयसिंग, तौसीफ शेख, रवी मारशेट्टीवार, सौरभ बंग, रोहित मोटघरे यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सहभागी झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com