Monsoon Session 2023 : Sarkarnama
मुंबई

Monsoon Session 2023 : सोमय्यांना भाजप पाठिशी का घालत आहे? विधीमंडळाच्या पायऱ्यांवरून विरोधकांचा सरकारला सवाल

Kiriti Somaiya Viral Video Case: कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल प्रकरणी किरीट सोमय्यांविरोधात विरोधी पक्ष चांगलेच आक्रमक झाले आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Opposition against Kirit Somaiya : "भारतीय जनता पक्ष किरीट सोमय्यांना पाठिशी का घालत आहे, भाजपने तात्काळ त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी जोरदार मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानसभेच्या पायऱ्यावर उभे राहत विरोधकांनी 'कलंकित' शब्द अधोरेखित करत सोमय्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे सोमय्यांचे व्हिडिओ प्रकरण भाजपला चांगलंच अंलगट आल्याचं दिसत आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या कथित व्हायरल व्हिडिओ प्रकरणी विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांनी 'महिलाविरोधी घटनाबाह्य सरकारचा धिक्कार असो,' अशी घोषणाबाजी करत भाजपवर निशाणा साधला. फलकांच्या माध्यमातूनही राज्यातील महिला असुरक्षित आहेत, याकडेही विरोधकांनी लक्ष वेधले आहे. सोमवारी (१७ जुलै) एका वृत्तवाहिनीवर किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ प्रदर्शित झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.

सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर अंबादास दानवे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करत एक पेन ड्रायईव्ह उपसभापतींकडे जमा केला. तर आमदार अनिल परब यांनीही या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमण्याची मागणी केली. दुसरीकडे, सोमय्या यांनीदेखील थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करण्याी मागणी केली होती.

मंगळवारी कामाकाजादरम्यान, विधान परिषदेत अंबादास दानवे यांनी किरीट सोमय्या यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले. सोमय्यांनी काही महिलांच्या असहाय्यतेचा फायदा घेतला. पक्षातील काही महिलांना पदे, जबाबदारी, महामंडळ देतो, असे सांगत त्यांची फसवणूक केली. काही महिलांनी माझ्याकडे अनेक तक्रारीही केल्या आहेत, पण त्यांची सुरक्षितता माझ्यासाठी महत्त्वाची असल्याचंही त्यांनी नमुद केलं. तसेच, सोमय्यांचे काही आक्षेपार्ह व्हिडिओ असलेले पेनड्राईव्ही विधापरिषदेत सादर करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.


Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT