Somaiya Viral Video Case: : सोमय्यांमुळे त्रास झाला, तरीही बाबा, त्यांच्या हक्कासांठी तुम्ही उभे राहिलात ; नताशाचं Tweet व्हायरल..

Natasha Awhads Tweet : अश्लील व्हिडीओ क्लिप प्रसारित केल्याने किरीट सोमय्या अडचणीत सापडले आहेत.
Somaiya Viral Video Case
Somaiya Viral Video CaseSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai : ‘हिसाब तो देना होगा,’ असे छातीठोकपणे सांगत अनेकांचे गैरव्यवहार चव्हाट्यावर आणणारे भाजपा नेते किरीट सोमय्या आता अडचणीत सापडले आहेत.

एका व्हिडीओ क्लिपमुळे सोमय्या विरोधकांच्या रडारवर आहे. त्यांच्याविरोधात ठाकरे गट आक्रमक झाला असून ठिकठिकाणी सोमय्यांचा निषेध करण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सोमय्यांवरील व्यक्तिगत हल्लाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. आव्हाडांच्या या भूमिकेचे त्यांची कन्या नताशा आव्हाड यांनी कौतुक केलं आहे. समाजमाध्यमांवर नताशाचं टि्वट व्हायरल होत आहे. एका वृत्तवाहिनीने सोमवारी दाखवलेल्या कथित अश्लील व्हिडीओ क्लिप प्रसारित केल्याने किरीट सोमय्या अडचणीत सापडले आहेत. त्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी टि्वट केलं होते.

Somaiya Viral Video Case
BJP News : पुणे ग्रामीण बारामती शहराध्यपदी वासुदेव काळे, तर पुणे मावळ शहराध्यपदी शरद बुट्टे पाटील यांची नियुक्ती

"राजकारणाचा स्तर प्रचंड खालावला आहे. वैयक्तीक हल्ले करुन एखाद्याचे राजकीय जीवन संपवायचे ह्या प्रकाराचा मी निषेध करतो. त्याचं वैयक्तीक जीवन जेव्हा तुम्ही संपवता; तेव्हा त्याचं घर, दार, त्याची पत्नी, मुले, सुना ह्या सगळ्यांवर त्याचा परीणाम होतो. आपला तो राजकीय शत्रू जरी असेल तरी तो विचारांचा शत्रू आहे. वैयक्तीकरीत्या त्याच्यावर हल्ला करुन त्याचे वैयक्तीक जीवन उध्वस्त करण्याचा अधिकार आपल्याला कोणालाच नाही," असं टि्वट आव्हाडांनी करीत सोमय्यांचा निषेध करणाऱ्यांना सुनावलं आहे.

आव्हाडांचे हे टि्वट रिटि्वट करीत त्यांची कन्या नताशा यांनी आपल्या बाबाचं कौतुक केलं आहे. "बाबा,जेव्हा तुम्ही covid मध्ये सिरियस होतात,तेव्हा हेच किरीटजी तुम्ही आजारी नाहीतच,नाटक करत आहात असे खोटे आरोप करत पुरावा मागत होते.तेव्हा आपल्या परिवाराने यांच्यामुळे खूप मानसिक त्रास भोगले. तरी आज किरीटजींच्या खासगी आयुष्याच्या हक्कांसाठी उभे राहिलात हे अभिमानास्पद आहे," असे टि्वट नताशा यांनी केलं आहे. राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. या अधिवेशनात सोमय्यांच्या कथिक व्हिडिओ क्लिपवरुन विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.