Salman khan- Vadhwan Bungalow Sarkarnama
मुंबई

Tiger Shroff: टायगर श्रॉफवरील गोळीबाराचं कनेक्शन सलमान खानच्या नावाशी का आहे? काय आहे यामागचं खरं कारण?

Tiger Shroff Firing Case: या हल्ल्यामध्ये टायगर श्रॉफ थोडक्यात बचावला आहे पण गोळीबारात तो जखमी झाला आहे. त्याच्यासोबत त्याचा ड्रायव्हर आणि इतर दोघे जण देखील जखमी झाले आहेत.

Amit Ujagare

Tiger Shroff: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावरील गोळीबाराचं कनेक्शन हे थेट प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याच्या नावाशी जोडलं गेलं आहे. टायगरवरील हल्ल्याची जबाबदारी कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्या गँगनं स्विकारली आहे. या हल्ल्यामध्ये टायगर श्रॉफ थोडक्यात बचावला आहे पण गोळीबारात तो जखमी झाला आहे. त्याच्यासोबत त्याचा ड्रायव्हर आणि इतर दोघे जण देखील जखमी झाले आहेत. १८ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या जुहू इथं एका कार्यक्रमातून निघाल्यानंतर टायगर श्रॉफच्या कारवर तीन अज्ञात तरुणांनी गोळीबार केला होता.

टायगरला दिला होता इशारा?

सलमान खानसोबत काम करणाऱ्यांना यापूर्वीच लॉरेन्स बिश्नोई गँगनं इशारा दिला होता, पण याकडं टायगरनं दुर्लक्ष केल्यानचं त्याच्यावर हल्ला झाला होता. खरंतर टायगर या हल्ल्यातून बचावला असून तो किरकोळ जखमी झाला आहे. पण त्याच्या ड्रायव्हर आणि आणखी एकजण मात्र जखमी झाला आहे. पण या हल्ल्याद्वारे हा सलमानसोबत व्यावसायिक संबंध असणाऱ्यांना एक प्रकारे इशाराच असल्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. आता तपास पथकं या हल्ल्यातून दिलेल्या संदेशामागचं सत्यता तपासत आहेत, तसंच गँगचा सहभाग तपासला जात आहे.

सलमान खानचं नाव काय आलं समोर?

या हल्ल्यासंदर्भीतल एक सोशल मीडिया पोस्ट आणि ऑडिओ मेसेज समोर आल्यानंतर त्याचा लॉरेन्स बिश्नोई गँगशी कनेक्शन असल्याचं समोर आलं. यामध्ये गँगचे सदस्य अनिल पंडीत आणि हरमन संधू यांनी टायगरवर हल्ल्याची जबाबदारी स्विकारली. विविध वृत्तांनुसार, टायगरला यापूर्वीच बिश्नोई गँगनं सलमान खानसोबत काम न करण्याचा इशारा दिला होता, पण त्यानं याकडं दुर्लक्ष केलं होतं. त्याचबरोबर मुंबईतल्या चित्रपटसृष्टीतील सदस्यांना देखील या गँगनं इशारा दिला होता, सलमान खानसोबत काम करत आहेत. तसंच या हल्ल्याद्वारे त्यांना देखील टार्गेट करण्यात आल्याचं दिसून आलं आहे.

त्याचबरोबर सलमान खानसोबत यापुढेही जो कोणी व्यावसायिकदृष्ट्या जोडला जाईल त्याला देखील लॉरेन्सच्या गँगच्या मागण्या मान्य करणार नाहीत त्यांना देखील धोका असेल, असा या गँगचा इशारा आहे. या गँगनं सलमान खानला देखील लॉरेन्स बिश्नोईची आणि बिश्नोई समाजाची माफी मागावी अशी मागणी केली आहे. पण या सगळ्या गोष्टी केवळ गृहितकावर आधारित असल्या तरी त्यातून टायगरवर नेमका कशासाठी हल्ला झाले? हे अद्याप सिद्ध झालेलं नाही. जरी या गँगच्या सदस्यांनी आपणच हल्ला केल्यााच दावा केला असला तरी, मुंबई पोलीस अद्यापही या हल्ल्यामध्ये बिश्नोई गँगचा सहभाग आहे की, नाही हे कन्फर्म करत आहेत.

टायगरला का केलं टार्गेट?

हल्ल्यासंबंधीच्या मेसेजमध्ये टायगरला सलमान खानसोबत काम न करण्याचा इशारा देण्यात आला होता पण त्यानं त्याकडं दुर्लक्ष केलं असं सांगितलं जात आहे. पण ही घटना म्हणजे बॉलिवूडमधील इतर कलाकारांना इशारा असल्याचंही मानलं जात आहे. पण टायगरवर हल्ला करण्यामागचं नेमकं कारण मात्र अद्याप समोर आलेलं नाही. पण आता हे पोलिसांच्या तपासावर अवलंबून आहे की, हा मेसेज खरा आहे की खोटा?

सलमान खान आणि बिश्नोई गँगचा इतिहास काय?

लॉरेन्स बिश्नोई गँगनं गेल्या काही वर्षांपासून सलमान खानला धमक्या द्यायला सुरुवात केली आहे. या धमकीचं मूळ हे १९९८ मध्ये राजस्थानात झालेल्या काळवीटाच्या शिकारीपर्यंतचं आहे. या शिकारीप्रकरणी सलमान खानवर गुन्हा देखील दाखल झाला होता. 'हम साथ साथ है', या सिनेमाच्या शुटिंगवेळी ही घटना घडली होती, बिश्नोई समाजासाठी काळवीट या प्राण्यावर मोठी श्रद्धा आहे. याच कारणातून एप्रिल २०२४ एका शूटरनं सलमान खानच्या बांद्र्याच्या घराबाहेर गोळीबार केला होता. त्यानंतर सलमान खानच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT