Zeeshan Siddique : झिशान सिद्दीकींचा सरकारला सवाल; ‘माझ्यावर गोळीबार होण्याची वाट पाहताय का?’

iger Shroff firing incident : टायगर श्रॉफ यांच्या कारवरील गोळीबारानंतर झिशान सिद्दीकी आक्रमक; लॉरेन्स बिश्नोईची चौकशी करण्याची मागणी, दोन महिन्यांत चार धमक्या मिळाल्याचा दावा.
Zeeshan Siddique
Zeeshan SiddiqueSarkarnama
Published on: 
Updated on: 

Tiger Shroff firing News : अभिनेता टायगर श्राॅफ कारवरील गोळीबार प्रकरणात अजित पवार राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दीक यांनी गुजरातकडे बोट दाखवत चांगलेच आक्रमक झाले. लॉरेन्स बिश्नोई हा सध्या गुजरातमधील एका तुरुंगात आहे.

त्याचीही चौकशी व्हावी, या मागणीवर आम्ही ठाम आहोत. गेल्या दोन महिन्यात मला चार वेळा धमक्या मिळाल्या आहेत. झिशान सिद्दीकीवर गोळीबार होण्याची सरकार वाट पाहत आहे का? असा गंभीर सवाल त्यांनी राज्यातील महायुती सरकारला केला.

मुंबईच्या (Mumbai) जुहू चौपाटीवर अभिनेता टायगर श्राॅफ याच्या कारवर लॉरेन्स बिश्नोई गँगच्या अनिल पंडित व त्याच्या साथीदारांनी 'अंधाधुंध' गोळीबार केला. या घटनेमुळे बॉलीवुडमध्ये खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात टायगर श्राॅफ बचावले असले, तरी त्यांचा कार चालक आणि एक चाहता, असे दोघे गंभीर जखमी झाले आहे. मुंबईतील गुन्हेगारीवरून राजकीय पडसाद उमटण्यास सुरूवात झाली आहे.

अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या 12 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री वांद्रे (पूर्व) येथे घडली होती. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली होती. अभिनेता सलमान खान यांच्याशी असलेल्या जवळीकतेमुळे ही सुपारी दिल्याचे तपासात समोर आले. बाबा सिद्दिकी यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांनी टायगर श्राॅफ यांच्यावर गोळीबार प्रकरणात थेट लॉरेन्स बिश्नोईकडे बोट दाखवत तो गुजरातच्या तुरुंगात असल्याचे म्हटले आहे.

Zeeshan Siddique
Tiger Shroff car firing : टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरारक घटनाक्रम

अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार झिशान सिद्दीकी म्हणाले, "बिश्नोई गँग असो किंवा अन्य कोणतीही गँग, त्यात अनमोल बिश्नोईचाही समावेश आहे. आम्ही त्याला भारतात परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. मी आणि माझ्या कुटुंबीयांनी अनमोल बिश्नोईला भारतात परत आणण्यासाठी अमेरिकन सरकारला सहकार्य करण्याची विनंती केली आहे."

Zeeshan Siddique
Tiger Shroff car firing : टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरारक घटनाक्रम

मुंबई पोलिसांना अद्याप त्याची चौकशी करण्याची संधी मिळालेली नाही. लॉरेन्स बिश्नोई हा माझ्या माहितीनुसार तो सध्या गुजरातमधील एका तुरुंगात आहे. त्याचीही चौकशी करण्यात यावी, अशी आमची ठाम मागणी आहे. माझ्या वडिलांच्या हत्येत त्याचा सहभाग असल्याचे दावे केले जात असतील, तर या हत्येमागील सूत्रधार कोण होता, हे शोधून काढला पाहिजे, असेही झिशान सिद्दीक यांनी म्हटले.

मुंबईत अभिनेते, राजकारणी आणि व्यावसायिकच सुरक्षित नसतील, तर सर्वसामान्य नागरिक सुरक्षित कसे राहणार? असा प्रश्न करताना, गेल्या दोन महिन्यांत मला चार वेळा धमक्या मिळाल्या आहेत. तरीही माझ्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली नाही. झिशान सिद्दीकीवर गोळीबार होण्याची सरकार वाट पाहत आहे का? त्यानंतरच सरकार माझी सुरक्षा वाढवण्याचा विचार करणार आहे का? ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. माझ्या मते, सरकारने याप्रकरणी शक्य तितकी कठोर पावले उचलली पाहिजेत, अशीही मागणी झिशान सिद्दीकी यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com