Jayant Patil Sarkarnama
मुंबई

Jayant Patil ON NCP rebels : राष्ट्रवादीतील बंडखोरांच्या निलंबनावर जयंत पाटील काहीच का बोलत नाहीत ?

Maharashtra Politics : राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात पडद्यामागे काहीतरी शिजतयं हे मात्र नक्की !

सरकारनामा ब्यूरो

NCP News : महिनाभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडली. त्यानंतर शिंदे-फडणवीसांच्या गोटात गेलेल्या अजित पवारांसह त्यांच्या समर्थक आमदारांवर कारवाई करण्याचा इशारा राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला होता, त्याचं काय झालं ? या कारवाईबाबत आता जयंत पाटील काहीच का बोलत नाहीत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दुसऱ्या गटाचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासोबत जयंत पाटलांच्या रंगलेल्या गप्पा आपण पाहिल्या. त्याच्या मनोमीलनाचे फोटोही माध्यमांवर झळकले. या सर्व घडामोंडीमुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात पडद्यामागे काहीतरी शिजतयं हे मात्र नक्की !

राज्याच्या सत्तासंघर्षात भाजपनं राष्ट्रवादीत उभी फूट पाडली. एक गट हा विरोधात तर दुसरा गट हा सत्तेत अशी दुहेरी भूमिका सध्या राष्ट्रवादी बजावत आहे. राष्ट्रवादीच्या फूटीनंतर पहिले चार-पाच दिवस दोन्ही गटाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये झालेला कलगीतुरा आपण पाहिला. पण आता त्यानंतर दोन्ही गटात शांतता आहे.

हा गट विरोधात आहे की सत्तेत ?

एकनाथ शिंदे शिवसेनेत बाहेर पडल्यानंतर शिवसेनेत टोकाचं बंड झाले, तसे बंड राष्ट्रवादीत का दिसत नाही, याचं कारण म्हणजे राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चा अजून थांबलेल्या नाहीत, हे स्पष्ट आहे. राज्याच्या पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादीचा गट सभागृहात कुठे बसणार, ही चर्चा सुरु असताना अजित पवार गट हा सहाजिकच सत्तेत असणाऱ्या शिंदे-भाजपसोबत बसला तर दुसरा गट (शरद पवार गट) हा सभागृहाच्या मध्यभागी बसला, त्यामुळे हा गट विरोधात आहे की सत्तेत हे समजायला मार्ग नाही.

दोन्ही गट एकत्र येतील का ?

राष्ट्रवादीचा एक गट सत्तेत असल्यामुळे ईडीच्या कारवाया रोखल्या गेल्या असल्याचेही बोलले जाते. भाजपला महाराष्ट्रात पुन्हा सत्ता आणायची असेल, तर अजित पवार हे त्यांच्यासाठी हुकमी एक्का आहेत, हे भाजपला पक्क ठाऊक आहे, म्हणून भाजपने त्यांना थेट सत्तेत सहभागी करुन घेतलं. राजकारणात काहीही घडू शकते, हे जर खरं असेल तर येणाऱ्या काळात राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येतील का? याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. पण तूर्त तरी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात आलबेल आहे.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT