Vinod Tawde
Vinod Tawde  Sarkarnama
मुंबई

Vinod Tawde : येत्या निवडणुकीत भाजपच्या जागा घटणार?; 'त्या' अहवालाबद्दल विनोद तावडेंनी दिलं स्पष्टीकरण..

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, अखेर अजित पवार यांनी स्पष्टीकरण देत या सर्व चर्चांवर पडदा टाकला.

अजित पवार हे भाजप प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू असतानाच भाजपचे टेन्शन वाढवणारी एक बातमी समोर आली होती. येत्या विधानसभा निवडणुकीत 2019 च्या तुलनेत भाजपच्या जागा घटणार असल्याचा अहवाल समोर आला असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या होत्या.

एवढंच नव्हे तर हा अहवाल भाजप नेते विनोद तावडे यांच्या समितीने केंद्रीय नेतृत्वाला दिला आहे, असंही बातम्यामध्ये म्हटलं होतं. या अहवालामुळे भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली. मात्र, आता या सर्व प्रकरणावर खुद्द विनोद तावडे यांनी ट्विट करत स्पष्टीकरण दिलं आहे. ''असा कुठलाही अहवाल मी सादर केलेला नसून महाराष्ट्रात भाजप अधिक मजबूतच झाली आहे'', असं त्यांनी म्हटलं आहे.

काय आहे विनोद तावडेंचं ट्विट?

''दिवसभर माध्यमांद्वारे मी कोणता तरी अहवाल सादर केला आहे ज्यात राज्यात भाजपाची ताकद कमी झाल्याचा दावा केला जात आहे. असा कोणताही अहवाल मी सादर केला नसून, भाजपाची शक्ती शिंदे -फडणवीस सरकार आल्यानंतर उलट वाढलीच आहे. पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात झालेल्या विकासामुळे महाराष्ट्रात भाजपा अधिक मजबूतच झाली आहे, असं स्पष्टीकरण ट्विटद्वारे विनोद तावडे यांनी दिलं आहे.

दरम्यान, येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या जागा घटणार, असा अहवाल समोर आला असल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर आता यावर भाजप नेते विनोद तावडे यांनी स्पष्टीकरण देत या सर्व चर्चा फेटाळल्या आहेत. उलट भाजपची शक्ती आणि शिंदे -फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्रात भाजप अधिक मजबूतच झाली असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

(Edited By Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT