Praful Patel-Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

Praful Patel News : शरद पवारांना फोन करणार...पण आता आम्ही मागे फिरणार नाही; प्रफुल्ल पटेलांनी केली भूमिका स्पष्ट

कायदेशीर कारवाईचा आमच्यावर कोणताही फरक पडणार नाही.

सरकारनामा ब्यूरो

NCP NEWS : ज्येष्ठ नेते शरद पवार यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यासाठी मी फोन करणार आहे. पण, आता आम्ही मागे वळून बघणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी घेतली आहे. त्यामुळे अजित पवार आणि गटाने परतीचे दोर कापले आहेत, हे आता स्पष्ट होते. (Will call Sharad Pawar...but we will not turn back now : Praful Patel)

अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) बंड करत फूट पाडली. या वेळी अजित पवार यांच्यासोबत पक्षाचे संस्थापक सदस्य मोठ्या संख्येने आहेत. यात प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे यांच्यासारखे नेत आहेत. त्यामुळे अजित पवार गटानेही आरपारची गोष्ट करायला सुरुवात केली आहे.

दरम्यान, प्रफुल्ल पटेल (Prafull Patel)) यांनी सांगितले की, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यासाठी मी शरद पवार (Sharad Pawar) यांना फोन करणार आहे. येत्या दहा दिवसांत भविष्यातील वाटचालीसंदर्भात भूमिका स्पष्ट होणार आहे. कायदेशीर कारवाईचा आमच्यावर कोणताही फरक पडणार नाही, अशी भूमिकाही पटेले यांनी मांडली.

दरम्यान, राष्ट्रवादी आणि शरद पवारांकडून अजित पवारांसोबत गेलेल्या नेत्यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला काही प्रमाणात यश येताना दिसत आहे. कारण काल अजित पवार यांच्यासोबत असणारे वाईचे आमदार मकरंद पाटील यांनी आज शरद पवार यांच्यासोबत सातारा दौऱ्यात हजेरी लावली आहे.

प्रफुल्ल पटेल यांनी मात्र अजित पवार गटाची भूमिका ठामपणे मांडली आहे. ते म्हणाले की, आमच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत बोलले जात आहे. मात्र, आमच्या त्या कारवाईचा काहीही फरक पडणार नाही. आता आम्ही मागे वळून बघणार नाही, अशी ताठर भूमिका घेतली आहे.

दरम्यान, अजित पवार यांनी रविवारी बंड करून शिवसेना आणि भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. पवार यांच्यासोबत धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, अनिल भाईदास पाटील, आदिती तटकरे, धर्मरावबाबा आत्राम, संजय बनसोडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतरही पवारांनी न डगमगता लढण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT