NCP : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल होत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. अजित पवार यांच्याबरोबर छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ यांच्यासह अजून काही नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
त्यामुळे शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीतही फूट पडली आहे. या सर्व घडामोडींवर शरद पवार यांनीही यावर भाष्य केलं. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही पत्रकार परिषद घेत आपलं मत माडलं आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, "राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा कोण असं पवार साहेबांना विचारलं. त्यावर त्यांचं उत्तर ऐकून मला असं वाटतं की साताऱ्याची सभा आणि पवार साहेबांचं आजचं उत्तर हे कुणालाही उर्जा देणारं आहे. माझ्या स्वतःसाठी सुद्धा हे प्रेरणा देणारं आहे. संघर्ष कसा करायचा हे शरद पवार यांना माहित आहे. संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यात असतो त्यामधून ना उमेद व्हायचं की पुन्हा उभा राहयचं हे ठरवायचं असतं", असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.
"जे भाजपबरोबर गेले ते माझे सहकारी नाहीत तर माझ्या कुंटुबातील व्यक्ती आहेत. मात्र, आजची घटना वेदना देणारी आहे. पण पुन्हा एकदा पक्षसंघटना उभी करू. लोकांमध्ये जावून जोमाने काम करू. आपल्या देशात लोकशाही आहे. प्रत्येकाला आपला निर्णय घेण्याचा अधिकार आहे", असं सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या बंडावर बोलताना आपली प्रतिक्रिया दिली.
अजितदादांबद्दल बोलताना सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
"अजितदादा आणि माझ्यात कधीच वाद होऊ शकत नाही. अजितदादा आणि माझ्यात काही गोष्टींवर चर्चा झाली. दादाबद्दल प्रेम आहे आणि कायम राहिल. तो मोठा दादा आहे. दादाशी कधीही मी वाद घालणार नाही. जेव्हा पक्षाचा प्रश्न येतो तेव्हा मी मी प्रोफेशनली बघते".
"2019 नंतर माझ्यावर जबाबदारी वाढली. देशात लोकशाही आहे. प्रत्येकाला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. नाती आणि कामात गल्लत नको, याची मला जाणीव आहे. अजितदादा माझा भाऊ आहे मी आयुष्यभर त्याच्यासोबत राहील. शरद पवार माझे वडील आहेत. मी त्यांचीही साथ सोडणार नाही", असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.
Edited By : Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.