Mumbai News : महाविकास आघाडीतील (MVA) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना आणि शरद पवार (Sharad Pawar) यांची राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) या दोन पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर आता तिसऱ्या आणि सर्वात मोठा पक्ष उरलेल्या काँग्रेसमध्येही फूट होणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या बातमीनुसार, भाजपच्या सूत्रांनी दावा केला आहे की, काँग्रेसचे दोन प्रमुख नेते भाजपशी चर्चा करत असून, ही चर्चा आता अंतिम टप्प्यात आली आहे. यापूर्वी महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही काँग्रेस आणि इतर पक्षांचे नेते पक्षांतर करण्यास इच्छुक असल्याचा दावा केला होता. (Latest Marathi News)
भाजपच्या संपर्कात काही काँग्रेस नेते आहेत का? असे विचारले असता मुनगंटीवार यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, "केवळ काँग्रेसच नाही, तर असे अनेक लोक आहेत जे त्यांच्या पक्षांवर नाराज आहेत. कारण त्यांचे नेते स्वार्थ भावाने भरलेले आहेत. ते देशाच्या प्रगतीच्या मार्गात अडथळे निर्माण करतात, आणि त्यांना पंतप्रधानपदी मोदी नको आहेत. पण देशातल्या लोकांची भावना आहे की, मोदीच पंतप्रधान व्हावेत.”
दरम्यान, मात्र काँग्रेसने या सर्व शक्यतांना फेटाळून लावले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेली फूट पाहता महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसने लक्ष केंद्रीत झाले आहे. मात्र, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाजपने यापूर्वी काँग्रेसलाही फोडण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला होता. चव्हाण म्हणाले होते, "दोन तृतीयांश संख्याबळ ३० आमदारांचे आहे, जे फोडणे सोपे नाही. एक किंवा दोन आमदार सामील होऊ शकतात."
रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र यानंतर काँग्रेसही सावध झाली असून, आपली संघटना एकसंध ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मंगळवारीच पक्षाची बैठक होऊन परिस्थितीवर चर्चा झाली. बैठकीनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, "आम्ही मजबूत आणि एकजूट आहोत. आम्ही कायम महाविकास आघाडीसोबत आहोत."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.