Jaykumar Gore Vs Jayant Patil  Sarkarnama
मुंबई

Jaykumar Gore Vs Jayant Patil : '... तर जयंत पाटील सभागृहाची माफी मागतील का?' ; जयकुमार गोरेंचा आव्हानात्मक सवाल!

MLA Jaykumar Gore News : जाणून घ्या, नेमकं काय आहे प्रकरण? ; 'जयंत पाटलांनी सभागृहात काहीही बोलू नये, ते चालणार नाही.' असंही जयकुमार गोरेंनी म्हटलं आहे.

विशाल गुंजवटे

Maharashtra Assembly Monsoon Session 2024 : 'छत्रपती शिवाजी एज्यूकेशन सोसायटीच्या हॉस्पिटलबाबत मृत रुग्ण जिवंत दाखवून शासनाचे पैसे हडपल्याच्या जयंत पाटील यांनी केलेल्या आरोपाची चौकशी केली जावी. मात्र त्यांनी एखाद्याचे करियर उध्वस्त करण्यासाठी केलेल्या आरोपात तथ्य निघाले नाही, तर ते सभागृहाची माफी मागतील का?.' असा प्रश्न आमदार जयकुमार गोरे अधिवेशनात उपस्थित केला.

कोरोना काळात हॉस्पिटलकडे एक रुपया नसताना स्वतःच्या खात्यावरुन पैसे पाठवून पावणेचार कोटींचा निधी रुग्णांवरील उपचारासाठी उपलब्ध करुन दिला होता, असेही आमदार गोरे यांनी सभागृहात बोलताना सांगितले.

मायणी येथील मेडिकल कॉलेजमध्ये कोरोना काळात मृत रुग्णांना जिवंत दाखवून शासनाचे पैसे हडप केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(Jayant Patil) यांनी विधिमंडळ सभागृहात केला होता.

यावर स्पष्टीकरण देताना आमदार गोरे म्हणाले, 'अर्थसंकल्पावरील मागण्यांबाबत सभागृहात चर्चा सुरु असताना जयंत पाटील यांनी छत्रपती शिवाजी एज्यूकेशन सोसायटीच्या हॉस्पिटलवरुन माझ्यावर शासनाचे अनुदान लाटल्याचे वैयक्तिक आरोप केले होते. मी जुलै 2019मध्ये या संस्थेचा अध्यक्ष झालो.'

पुढे 'कोरोना महामारी आल्यावर एप्रिल 2020मध्ये या हॉस्पिटलचा शासनाने महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समावेश केला.तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी हॉस्पिटल शासनाच्या ताब्यात घेऊन ते सुरु केले. त्यावेळी कोरोनाच्या फक्त शासकीय चाचण्या होत होत्या. जे रुग्ण शासनाच्या चाचणीनुसार पॉझिटिव्ह होते त्यांना रुग्णालयात भरती केले जात होते. हॉस्पिटलच्या नावावर त्यावेळी पैसे नव्हते. शासनाच्या कोणत्याही मदतीशिवाय माझ्या खात्यावरील पैसे पाठवून रुग्णांच्या उपचारासाठी हॉस्पिटल सुरु करण्यात आले होते.' असंही जयकुमार गोरे(Jaykumar Gore) म्हणाले.

याचबरोबर 'रुग्णांचे जीव वाचावेत म्हणून पावणेचार कोटी मी उपलब्ध करुन दिले होते. त्यावेळी कोरोना उपचारावरील कोणताही प्रोटोकॉल उपलब्ध नव्हता. डॉक्टरही उपचार करायला धजावत नव्हते.' असंही गोरे म्हणाले.

आमदार गोरे म्हणाले, 'सदर हॉस्पिटलच्या माध्यमातून उपचार घेतलेल्या 584 रुग्णांचे महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून एक कोटी 46 लाखांचे अनुदान मिळाले होते. वस्तुस्थिती अशी असताना आमदार जयंत पाटील यांच्यासारख्या जेष्ठ सदस्याने बिनबुडाचे आरोप केले. बोगस एमबीबीएस प्रवेशांचे आरोप असणाऱ्यांच्या सांगण्यावरुन त्यांनी आरोप केले.'

याशिवाय 'मृत रुग्ण जिवंत दाखवून जर पैसे घेतले असतील तर चौकशी आणि कारवाई झालीच पाहिजे, मात्र एखाद्याचे करियर उध्वस्त करण्यासाठी त्यांनी आरोप केले आहेत. ज्यांना निवडणूक लढायची आहे त्यांनी लढावी.

मात्र जयंत पाटलांनी सभागृहात काहीही बोलू नये, ते चालणार नाही. मृत रुग्ण जिवंत दाखवून एकाही रुग्णाचे पैसे घेतले असतील कारवाई करावी. मात्र हे जर चुकीचे आरोप असतील तर जयंत पाटील सभागृहाची माफी मागणार का?', असा प्रश्नही गोरेंनी विधानसभा अध्यक्षांसमोर उपस्थित केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT