Monsoon Assembly Session : राम कदम 'संतापले', उत्तर देताना नाना पटोलेही 'भडकले', विधानसभेत वातावरण तापलं; घडलं काय?

Nana Patole Vs Ram Kadam : 'लाडकी बहीण' योजनेवरून नाना पटोले आणि राम कदम विधानसभेच भिडल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे सभागृहातील वातावरण गरम झालं होतं.
ram kadam nana patole
ram kadam nana patolesarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Monsoon Session : विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. एकीकडे विधान परिषदेचं मतदान सुरू असताना दुसरीकडे विधानसभेत 'लाडकी बहीण' योजनेवरून विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं.

काँग्रेस, राष्ट्रवादी ( शरदचंद्र पवार ), शिवसेनेचे ( ठाकरे गट ) कार्यकर्ते 'लाडकी बहीण' योजनेचे चुकीचे फॉर्म भरत असल्याचा आरोप भाजप आमदार राम कदम ( Ram Kadam ) यांनी केला. यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे 'लाडकी बहीण' योजनेवरून राम कदम 'संतापले', तर उत्तर देताना नाना पटोले 'भडकल्या'नं वातावरण तापलं होतं.

नेमकं घडलं काय?

राम कदम म्हणाले, "नाना पटोले 'लाडकी बहीण' योजनेबद्दल बोलले. माझ्या घाटकोपरमध्ये मतदारसंघात एक घरात तीन बहिणी आहेत. त्यांना दरमहिन्याकाठी साडेसात हजार रूपये मिळणार आहेत. पण, काँग्रेस, राष्ट्रवादी ( शरदचंद्र पवार ) आणि शिवसेनेचे ( ठाकरे गट ) कार्यकर्ते चुकीचे फॉर्म भरत आहेत. महिलांना पैसे मिळू नये म्हणून चुकीचे फॉर्म भरले जात आहेत. पैसे नाही मिळाल्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या नावानं तुम्हाला बोंबलत बसणार. त्यासाठी चुकीचं फॉर्म भरला जात आहे."

"भांडी घासणाऱ्या महिलेला पैसे मिळतात हे तुम्हाला बघवत नाही. तुम्हाला चांगल्या योजनेत राजकारण करायचं आहे. गरीबांना पैसे मिळुद्यात. झोपडपट्टीत राहणाऱ्या महिलेला पैसे मिळत असतील, तर तुमचं काय जात आहे?" असा संतप्त सवाल राम कदम यांनी विचारला.

ram kadam nana patole
Sadashiv Lokhande : सदाशिव लोखंडेंची विधानसभेसाठी मुंबईत चाचपणी? भानुदास मुरकुटेंची जुळवाजुळव गुलदस्त्यात

त्यानंतर नाना पटोले ( Nana Patole ) म्हणाले, "लाडकी बहीण योजनेला आमचा कुठलाही विरोध नाही. सरकारनं काय करायचं ते करावं? पण, महसूल विभागाच्या वेबसाइटच्या काही अडचणी आहेत. पण, कागदपत्रांसाठी तहसील कार्यालयात गर्दी झाली आहे. महिलांना जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला मिळत नाही. पण, यांना राजकारण करायचं आहे. हे सत्तेच्या बाहेर जाणार आहेत."

"विधानसभेत काय चाललं आहे? मंत्री उत्तर देत नाहीत. मी राजकारण केलं नाही. आम्ही अडचणी सांगितल्या," असं प्रत्युत्तर नाना पटोले यांनी राम कदम यांना दिलं.

ram kadam nana patole
Congress Meeting in Jalgaon : काँग्रेस गटबाजीने त्रस्त, बैठकीला जिल्हाध्यक्षांचीच दांडी

यानंतर राम कदम संतापत म्हणाले, "निवडणूक येतील जातील, सत्तेत कोण येणार हे परमेश्वर ठरवेल. पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महिलांना 'लाडकी बहीण' योजनेतून पैसे देत आहेत. तुम्हाला काय अडचण आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com