Maharashtra Politics:  Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar On Rumours: परत बोलणार नाही...: भाजपसोबत जाण्याच्या बातम्यांवर अजित पवार स्पष्टचं बोलले

Maharashtra Politics: विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

सरकारनामा ब्युरो

Ajit Pawar News Update : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. आज सकाळपासून पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार (Ajit Pawar In Touch With BJP) यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे 40 आमदार भाजसोबत जाण्याच्या चर्चा सुरु आहेत. (Will not talk back Ajit Pawar speaks clearly on the news of going with BJP)

पण परंतु अजित पवार यांनी हे वृत्त फेटाळलं असून या फक्त नव्या ‌राजकीय समीकरणांच्या चर्चा आहेत, त्यात काही तथ्य नाही, अशी प्रतिक्रीया अजित पवार यांनी दिली आहे. तसेच, मी पुन्हा पुन्हा प्रतिक्रिया देणार नाही, माध्यमांनी स्वतःच्या मनाने बातम्या चालवल्या असल्याचंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. (Maharashtra Political Crisis)

इंडियम एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, 2019 मध्ये अजित पवारांनी केलेलं बंड शरद पवारांमुळेच फसलं होतं. कारण अजित पवारांसोबत गेलेल्या सर्व आमदारांना खुद्द शरद पवारांनी स्वतः फोन केले होते. पण, यावेळी शरद पवार (Sharad Pawar) यांनी कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याने शरद पवारांच्याही मनात नेमकं काय आहे, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT