Maharashtra Politics: ऑपरेशन लोटस्; काँग्रेस,राष्ट्रवादी आणि ठाकरे गट मिळून 40 आमदार फुटणार? पुन्हा नवी चर्चा...

BJP Operation Lotus : लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकीआधी महाविकास आघाडीची वज्रमूठ खिळखिळी करण्यासाठी भाजपची मोठी खेळी
Maharashtra Political Crisis:
Maharashtra Political Crisis: Sarkarnama
Published on
Updated on

रश्मी पुराणिक

Mumbai : मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक नाट्यमय आणि वेगवान घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या भाजपसोबत जाण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.तसेच त्यांच्याकडे राष्ट्रवादीच्या ५३ पैकी ४० आमदारांचं पत्र असल्याचं देखील माहिती समोर येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकीआधी महाविकास आघाडीची वज्रमूठ खिळखिळी करण्यासाठी भाजपची मोठी खेळी सुरु असल्याचं बोललं जात आहे.

राष्ट्रवादी काँगेसचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar) हे मागील काही दिवसांपासून पक्षावर नाराज असल्याचं बोललं जात आहे. तसेच लवकरच पवार हे भाजपसोबत जातील अशीही जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या भाजपसोबत जाण्याच्या प्रयत्नांना त्यांच्या पक्षातील आमदारांच्या संमती सह्या मिळाल्याने वेग आला आहे.

Maharashtra Political Crisis:
Nanded Market Committee : आघाडीकडून लढण्यासाठी इच्छूकांची गर्दी, तर भाजप-शिंदे युतीचा नाराजांवर डोळा..

आतापर्यंत राष्ट्रवादीच्या 53 पैकी 40 आमदारांनी संमतीच्या स्वाक्षऱ्या दिल्या असल्याची माहिती समोर येत आहे. राज्यात भाजपचं ऑपरेशन कमळ(BJP Operation Lotus) सुरु झालं असल्याची चर्चा आहे.

याचवेळी आता राज्याच्या राजकारणात आणखी एक नवा टि्वस्ट आला आहे.शिवसेनेनंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे आमदार भाजप फोडणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीसह काँग्रेसमधील माजी मुख्यमंत्री आपल्या दहा ते बारा समर्थक आमदारांसह भाजपात येण्याची शक्यता आहे. याचदरम्यान, ठाकरे गटाच्या ही दोन आमदारांवर भाजपाची नजर असल्याचं खात्रीशीर वृत्त आहे.

भाजपमधील इन्कमिंगमध्ये पुन्हा निवडून येऊ शकणाऱ्या आमदारांना भाजपकडून प्राधान्य देण्यात येत आहे अशी माहिती आहे. ह्या सर्व खेळींपाठीमागे भाजपचं लोकसभा मिशन असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Maharashtra Political Crisis:
Ajit Pawar Breaking News : अजित पवारांसोबत 40 आमदार बंडाच्या तयारीत? चर्चांना उधाण !

योग्यवेळी अजित पवार आपला पत्ता उघड करणार..

राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत. राष्ट्रवादीकडे सध्या स्थितीला 53 आमदार आहे. तर पक्षांतर बंदी कायद्याच्या नियमानुसार वेगळा गट स्थापन करण्यासाठी 36 आमदारांची गरज आहे. राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सध्या रंगू लागल्या आहे.

राष्ट्रवादीच्या 53 पैकी 40 आमदारांनी आपल्या संमतीच्या स्वाक्षऱ्या अजित पवार यांच्याकडे दिल्या असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिले आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेससह राज्याच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Maharashtra Political Crisis:
Kokan Politics: रामदास कदमांकडून ठाकरेंच्या गडाला सुरुंग; दापोलीत चार गावांतील ग्रामस्थांचा शिंदे गटात प्रवेश

महाविकास आघाडीची 'वज्रमूठ' टार्गेटवर

शिंदे-फडणवीस सरकारच्या धोरणाविरोधात महाविकास आघाडीनं राज्यभर वज्रमूठ सभा होत आहे. याची सुरुवात छत्रपती संभाजीनगर येथे झाली. या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर दुसरी सभा फडणवीसांच्या नागपूरमध्ये झाली आहे. या दोन्ही सभांना मिळणारा प्रतिसादानं भाजपसमोर तगडं आव्हान उभं केलं आहे. मात्र, तरीदेखील आघाडीतील अंतर्गत धूसफूस लपून राहिलेली नाही. याचाच फायदा भाजप उचलण्याच्या तयारीत आहे.

पहाटेच्या शपथविधीचा निर्णय पक्षाचा....

राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांनी 2019 च्या पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. गेल्या वेळी अजित दादा गेले होते तो देखील पक्षाचा निर्णय होता असं बनकर म्हणाले आहेत. आम्हाला शपथविधी साठी फोन करून बोलावलं होतं. यावेळेस देखील शरद पवारसाहेब आणि अजितदादा निर्णय घेतील. सध्या तरी आम्हाला कोणताही फोन नाही किंवा निरोप आलेला नाही असं दिलीप बनकर म्हणाले आहेत. पेपरमध्ये काय बातम्या आल्या माहिती नाही. पण अजितदादा असा निर्णय घेणार नाहीत. ते जो निर्णय असेल तो पक्षाचा असेल असंही बनकर म्हणाले आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com