Aditya Thackeray Sarkarnama
मुंबई

पुढचा खासदार येईपर्यंत राणे भाजपमध्ये राहतील का? : आदित्य ठाकरेंनी डिवचलं

Aditya Thackeray : नारायण राणेंचा आतापर्यंतचा चौथा पक्ष आहे.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : अंधेरीपूर्व विधानसभेची पोटनिवडणूचकीचा प्रचार आता शिगेला पोहचले आहे. शिवसेना ठाकरे गट, शिंदे गट आणि भाजपकडून जोरदार प्रचार केला जात आहे. प्रचारादरम्यान राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केंद्रिय मंत्री नारायण राणेंवर यांच्यावर जोरदार टीका केली.

नारायण राणे यांनी यापुढे मुंबईत शिवसेनेचा एकही खासदार निवडून येणार नाही, असे म्हणत शिवसेनेला डिवचले होते. यावर आता आदित्य ठाकरेंनी राणेंवर पलटवार केला आहे. "पुढचा खासदार निवडून येईपर्यंत नारायण राणे स्वतः भाजपमध्ये राहतील की नाही हाच प्रश्न आहे. हा त्यांचा आतापर्यंतचा चौथा पक्ष आहे. प्रत्येक वेळी आमच्याबद्दल बोलायच वाईट बोलायचं, हेच त्यांचे काम. त्यांच्याबद्दल जास्त काही बोलणार नाही. आम्ही कामांवर लक्ष देतो, अशा शब्दात ठाकरेंनी राणेंचा समाचार घेतला.

यावेळी त्यांनी इतरही अनेक मुद्यांवर प्रतिक्रीया दिली. आपण सगळेच स्थानिक स्वराज्य संस्थांवर चर्चा करतोय. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका घेण्याची खोके सरकारची तयारी दिसत नाही.सध्या लोकप्रतिनिधी नसताना वेगवेगळी टेंडर आणि वेगवेगळी कामे होत आहेत. लोकशाहीत असे चालत नाही. प्रशासकाच्या जागी महापौर बसायला हव्यात आणि नगरसेवकांच्या पदावर लोकं बसायला हवीत. यासाठी निवडणुका होणे, गरजेचे आहे. लोकशाहीत जे काही होतंय, ते धोकादायक आहे, असे ठाकरे म्हणाले.

जे काही राज्यात सुरू आहे, त्यानुसार शिवसेना फोडा, शिवसेनेला कमजोर करा, ठाकरे परिवाराला बाजूला करा, जे जे महाराष्ट्रासाठी आवाज उठवत आहेत त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न होतोय, असंच जर सुरू राहीले तर महाराष्ट्राचे 5 ते 6 तुकडे होतील, अशी संतप्त प्रतिक्रीयाही ठाकरेंनी व्यक्त केली. कोस्टल रोड असेल, वरळी शिवडी कनेक्टड असेल किंवा इतर काम असतील, ही कामे आम्ही सुरू केलेली होती. आमची पद्धत अशी होती की, दररोज अपडेट यायची, आठवड्यात आढावा मिटींग व्हायची. या सरकारला कुठेही अश्या कामात रस दिसत नाही. काम कमी आणि राजकारणच जास्त सुरू आहे, असे ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी इतकी कधीही घसरली न्हवती, ती आता घसरली आहे. आश्वासन किती लोकांना दिलय, हे त्यांच्या 40 लोकांनाही माहितीय. आश्वासन महत्वाचं नाही. लोकांची काम होत नाहीयेत, हे सत्य आहे. मुंबईचा आवाज कॅबीनेटमध्ये नाही, महिलांचा आवाज नाही.अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदतीवर त्यांचे काही उत्तर नाही. त्यांना खोके सरकार म्हटल्यावर, तुम्हाला पाहिजेत का असा प्रश्न विचारायला येतात.

जे 40 गद्दार लोक उद्धवसाहेबांचे होऊ शकले नाहीत, ते त्यांचे काय होणार. 40 जागांवर भाजप दावा करणार आहेत. यांना कुठेही लढवायला जागा उरणार नाही, असेही ठाकरे म्हणाले. दरम्यान आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच भेट झाली होती. यावर मला भेटीची माहिती नाही, त्यावर काही बोलणार नाही, असे ठाकरे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT