Sharad Pawar Latest News in Marathi Sarkarnama
मुंबई

NCP President Committee Meeting: राष्ट्रवादीच्या समितीचा निर्णय शरद पवार मान्य करणार का?

सरकारनामा ब्युरो

NCP President Committee Meeting : राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवड समितीच्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या या राजीनाम्याचा प्रस्ताव एकमताने नामंजूर करण्यात येत असल्याचा ठराव पारित करण्यात आला आहे, अशी माहिती खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. ते पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं. या बैठकीनंतर आम्ही शरद पवार यांना भेटणार असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं.

तसेच हा ठराव शरद पवार यांच्याकडे आपण सादर करणार आहोत. त्यांना आमचा निर्णय मान्य करावाचं लागेल. अशी इच्छाही पटेल यांनी यावेळी बोलून दाखवली. पण निवड समितीचा हा निर्णय शरद पवार मान्य करणार का, असा प्रश्न अद्यापही कायम आहे. याचं कारणही तसंच आहे. (Maharashtra Politics)

शरद पवार यांनी आतापर्यंत जे निर्णय़ घेतले ते कधीही मागे घेतले नाहीत, असे आतापर्यंतचे रेकॉर्ड आहे. पक्षाला पुढे न्यायचं असेल तर पक्षात नव्या व्यक्तीला संधी द्यायला हवी, अशी इच्छा शरद पवार यांनी व्यक्त केली होती. पण समितीतील सदस्य आणि राज्यभरातील, देशभरातील कार्यकर्ते, नेत्यांनी त्यांच्या राजीनाम्याला केलेला विरोध पाहता पवार कदाचित हा निर्णय़ मागे घेण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, शरद पवार यांनी ज्यावेळी राजीनाम्याची घोषणा केली तेव्हा सभागृहात एकच खळबळ उडाली होती. पक्षातील कोणालाही हा निर्णय मान्य नसल्याचे पक्षातील नेतेमंडळी सांगत होते. याच दरम्यान सभागृहात एकच गोंधळ उडाला. जवळपास दोन तासाहून अधिक वेळ कार्यकर्ते, सभागृहात उपस्थित असलेले नेते मंडळी त्यांना राजीनाम्याचा निर्णय मागे घेण्यासाठी मनधरणी करत होते. त्यानंतर राज्यभरातूनच नव्हे तर देशभरातून त्यांना अध्यक्षपद न सोडण्याबाबत मागणी होऊ लागली. (Sharad Pawar Resign Latest news Update)

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना फोन करून पवारांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी विनंती केली. जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, माकपचे नेते सीताराम ,आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंन्हा, सीपीआयचे चे नेता डी राजा यांनी पवारांना फोन केला आहे, अध्यक्षपदी पवारांनीत राहावे, अशी विनंती या नेत्यांनीही केली आहे.

लोकसभा निवडणुकीला फार काळ शिल्लक नसल्याने शरद पवार यांनी पक्षकार्यात कार्यरत राहावे, अशी इच्छादेखील या नेत्यांनी व्यक्त केल्याचे समजते. भाजपविरोधी आघाडीत शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची आहे. राष्ट्रीय पातळीवर विरोधकांची एकजूट करण्यासाठी शरद पवार हेच नाव अग्रणी असल्यामुळे त्यांनी राजीनाम्याचा विचार मागे घ्यावा असे विरोधी पक्षांचे मत आहे. काल (गुरुवारी) राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानसमोर आंदोलन केलं. या पार्श्वभूमीवर आता शरद पवार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT