Political buzz intensifies in Mumbai as speculation grows over Thackeray becoming the next Mayor amid BJP concerns over the lottery system. Sarkarnama
मुंबई

Mumbai Mayor : 'मुंबई'चा महापौर 'ठाकरे'च होणार? एका 'लॉटरी'मुळे भाजपची उडाली झोप, काय आहे समीकरण!

Will Thackeray become Mumbai Mayor : मुंबई महापौरपदावर ठाकरे विराजमान होणार का? एका लॉटरीमुळे भाजपची चिंता वाढली, जाणून घ्या संपूर्ण राजकीय समीकरण.

Rashmi Mane

BMC Mayor election Thackeray BJP : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक निकालांनंतर जरी सत्तासमीकरण कागदावर स्पष्ट दिसत असले, तरी महापौरपदाच्या शर्यतीमध्ये मुंबईच्या राजकारणात प्रचंड उत्सुकता आणि तणाव निर्माण झाला आहे. देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेचा महापौर नेमका कोण होणार, हा प्रश्न सध्या सर्वांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. बहुमत असूनही भाजप आणि महायुती पूर्णपणे निर्धास्त नाहीत, कारण या सगळ्या खेळाचा कळीचा मुद्दा आहे आरक्षणाची लॉटरी.

बीएमसीत एकूण 227 जागा असून बहुमतासाठी 114 नगरसेवकांची आवश्यकता असते. महायुतीकडे 118 नगरसेवक असल्याने संख्याबळाच्या जोरावर त्यांची बाजू भक्कम वाटते. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना यूबीटी गटाकडे मनसेसह मिळून सुमारे 71 नगरसेवक आहेत. मात्र महापौरपद हे केवळ संख्येवर ठरत नाही, तर ते आरक्षणाच्या लॉटरीवर अवलंबून असते. हीच बाब सध्या भाजपसाठी डोकेदुखी ठरत आहे.

उद्या म्हणजेच 22 जानेवारी रोजी महापौरपदासाठी आरक्षणाची लॉटरी काढली जाणार आहे. या लॉटरीत महापौरपद अनुसूचित जाती, ओबीसी किंवा अनुसूचित जमातीसाठी राखीव ठरणार की नाही, हे ठरणार आहे. मागील वेळी हे पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी होते, मात्र यंदा आरक्षण रोटेशननुसार बदलणार आहे. भाजप आणि शिंदे गटाकडे एससी आणि ओबीसी प्रवर्गातील नगरसेवक आहेत. मात्र जर लॉटरीत एसटी प्रवर्ग निघाला, तर सगळं चित्रच बदलू शकतं.

सध्या मुंबईत एसटी प्रवर्गातून निवडून आलेले नगरसेवक फक्त शिवसेना यूबीटीकडे आहेत. यामध्ये वार्ड क्रमांक 121 मधून विजयी झालेल्या प्रियदर्शिनी ठाकरे आणि वार्ड 53 मधून निवडून आलेले जितेंद्र वलवी यांचा समावेश आहे. त्यामुळे एसटी आरक्षण निघाल्यास महायुतीकडे बहुमत असूनही महापौरपदासाठी पात्र उमेदवारच उरणार नाही. अशा परिस्थितीत यूबीटी गटाकडे महापौरपद जाण्याची प्रबळ शक्यता आहे आणि प्रियदर्शिनी ठाकरे ‘किंगमेकर’ किंवा थेट महापौरही ठरू शकतात.

मुंबई महापालिकेचा अंतिम कौल काय?

भाजप - 89

शिवसेना - 29

एनसीपी (NCP)- 3

शिवसेना ठाकरे गट - 65

काँग्रेस - 24

मनसे (MNS)- 6

एमआयएम (AIMIM)- 8

एसपी (SP)- 2

एनसीपी शप (NCP Sharad Pawar) - 1

निवडणूक निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी “देवाची इच्छा असेल तर आमचा महापौर होईल” असे विधान केले होते. हे विधान अनेकांनी हलक्यात घेतले, मात्र आता त्यामागचा राजकीय अर्थ स्पष्ट होत आहे. लॉटरीचा निकाल ठाकरे गटाच्या बाजूने लागल्यास अल्पसंख्यांक असूनही ते सत्ता मिळवू शकतात. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटाच्या गोटात अस्वस्थता वाढली आहे.

राजकीय वर्तुळात चर्चा आहे की भाजप या लॉटरी प्रक्रियेबाबत पर्यायी मार्गांचा विचार करत आहे. 2022 मध्ये निवडून आलेल्या बॉडीचा कार्यकाळ संपल्यानंतर जवळपास साडेतीन वर्षे महापालिका प्रशासकांच्या ताब्यात होती. त्यामुळे आरक्षण रोटेशन नव्याने करावे, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे 21 आणि 22 जानेवारीचे राजकीय घडामोडी अधिक महत्त्वाच्या ठरणार आहेत.

या सगळ्यात प्रियदर्शिनी ठाकरे यांच्याकडे विशेष लक्ष वेधले गेले आहे. त्यांनी वार्ड 121 मधून अवघ्या 14 मतांनी विजय मिळवला आहे. त्यांनी शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव केला. दुसरीकडे जितेंद्र वलवी यांनीही शिंदे गटाच्या उमेदवारावर मात केली आहे. विशेष म्हणजे महापौरपदासाठीची लॉटरी बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या अगदी एक दिवस आधी होत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला हा राजकीय योगायोग आपल्यासाठी शुभ ठरेल, अशी आशा आहे.

एकूणच, महापौरपदाची लॉटरी भाजपसाठी पेच निर्माण करणारी ठरत असून, ठाकरे आडनाव पुन्हा एकदा मुंबईच्या सत्तेच्या केंद्रस्थानी येणार का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT