Thackeray Vs Shinde
Thackeray Vs Shinde  Sarkarnama
मुंबई

Shinde vs Thackeray : धनुष्यबाणाचा निर्णय आज होणार की राखून ठेवणार?

सरकारनामा ब्यूरो

Shinde vs Thackeray : धनुष्यबाण कुणाला मिळणार? याबाबतची महत्वाची सुनावणी आज (ता.20 जानेवारी) केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुरू आहे. या दरम्यान दोन्ही गटाकडून आयोगासमोर जोरदार युक्तीवाद करण्यात आला.

तर शिंदे आणि ठाकरे गटाचा युक्तीवाद आजच पूर्ण होण्याची शक्यता असून त्यानंतर धनुष्यबाण चिन्हाबाबत आयोग आजच निर्णय देणार की अंतिम निर्णय राखून ठेवणार हे काही वेळातच समोर येणार आहे. त्यामुळे आयोगाच्या या निर्णयाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

आयोगासमोर दोन्ही बाजुच्यावतीने जोरदार युक्तिवाद करण्यात येत आहे. शिंदे गट राजकीय पक्ष नाहीये. शिंदे गटाची राष्ट्रीय कार्यकारिणी बेकायदेशीर आहे. ते गुवाहाटीला का गेले? असा सवाल यावेळी ठाकरे गटाच्यावतीने उपस्थित करण्यात आला. तसेच कपिल सिब्बल यांनी शिंदे गटाच्या याचिकेतील मुद्दे खोडण्याचा प्रयत्न केला. तसेच शिंदे गटाच्यावतीनेही जोरदार युक्तिवाद करण्यात येत आहे.

बंड झाल्यानंतर एक महिना आयोगाकडे येण्यासाठी का लागला? असा सवाल ठाकरे गटाने उपस्थित केला. तसेच राष्ट्रीय कार्यकारिणी आमच्यासोबत आहे. शिंदे गटाची राष्ट्रीय कार्यकारिणी बेकायदेशीर आहे, त्यामुळे ठाकरे गटाची कार्यकारिणी बरखास्त होऊ शकत नाही. ठाकरेंची कार्यकारिणी घटनेप्रमाणे असल्याचे यावेळी ठाकरे गटाच्यावतीने आयोगाला सांगण्यात आलं.

याच दरम्यान दोन मुद्दे ठाकरे गटाच्यावतीने उपस्थित करण्यात आले. राष्ट्रीय कार्यकारिणीला मुदतवाढ द्या, किंवा निवडणूक घ्या, अशी मागणी ठाकरे गटाच्यावतीने करण्यात आली. तसेच एकनाथ शिंदेंचे प्रतिज्ञापत्र तपासून पाहा, दोन्ही ठिकाणी आमचे संख्याबळ जास्त आहे. सभागृहांमध्ये देखील आमचे स्थान आहे. तसेच पक्षप्रमुख पदाला मुदतवाढ द्या, अशी मागणी ठाकरे गटाच्यावतीने आयोगात करण्यात आली.

तसेच घटनेनुसार प्रतिनिधी सभा आमच्याकडे आहे. शिंदे गटाकडे प्रतिनिधी सभा नाही. शिंदे गटाच्या कागदपत्रांमध्ये कमतरता असून 61 पैकी 28 जिल्हाप्रमुखांची प्रतिज्ञापत्र नाहीत. शिंदे गट हा राजकीय पक्ष नाही. ठाकरे गटच खरी शिवसेना आहे, असा युक्तीवाद ठाकरे गटाच्या वकीलांनी आयोगासमोर केला. तर यानंतर शिंदे गटाचे वकीलही युक्तीवाद करत आहेत. त्यामुळे आज दोन्ही गटाचा युक्तीवाद पूर्ण होण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT